नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:38 AM2021-05-11T04:38:47+5:302021-05-11T04:38:47+5:30
ओमविकास बहुउद्देशीय संस्था, चंद्रपूरद्वारा आयोजित मुलचेरा तालुक्यातील लोहारा या गावी कोरोना लसीकरणावर जनजागृती मेळावा घेण्यात आला, यावेळी ते ...
ओमविकास बहुउद्देशीय संस्था, चंद्रपूरद्वारा आयोजित मुलचेरा तालुक्यातील लोहारा या गावी कोरोना लसीकरणावर जनजागृती मेळावा घेण्यात आला, यावेळी ते बाेलत हाेते.
डॉ. पांडे म्हणाले, कोणत्याही व्यक्तीने लसीच्या दोन मात्रा घ्याव्या, दोन्ही मात्रा कोरोनापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी आवश्यक आहे. जगभरात कोराेनाने थैमान घातलेले असून, त्यापासून बचाव करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. लसीच्या पहिल्या मात्रानंतर आपली राेगप्रतिकारशक्ती वाढते मात्र दुसऱ्या लसीनंतर ती आणखीन किती तरी पटीने वाढत असते. त्यानंतर आपल्याला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला तरी त्याचे दुष्परिणाम दिसून येत नाही. कधी आपण पहिली मात्रा घेतली तर दुसरी लस घ्यायची गरज नाही, असा विचार अनेकांच्या मनात निर्माण होतो तसेच लस घेतल्यानंतरही कोराेना होतो त्यामुळे लस कशासाठी घ्यायची, असे एक ना अनेक विचार माणसाच्या मनात येत असतात आणि त्यामुळे प्रश्न उत्तर या माध्यमाद्वारे प्रा. डॉ. भारत पांडे यांनी लोहारा गावातील स्त्री-पुरुषासोबत चर्चा करून त्यांचे समाधान केले.
आष्टी येथील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दीपक पंदीलवार, करण लोणारे यांच्या पुढाकाराने कोरोना लसीकरणाबाबत चर्चा घडवून आणून अनेक शंकांचे समाधान केले. याप्रसंगी रसिका मडावी, दीपक गावंडे, अनिल गावडे, जिजाबाई आत्राम आदींसह गावकरी उपस्थित होते .