टाळेबंदी नियमांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:38 AM2021-04-09T04:38:51+5:302021-04-09T04:38:51+5:30
शासन निर्देशाप्रमाणे कोविड-१९ साथरोगअंतर्गत ‘मिशन बिगीन अगेंन’नुसार वेळोवेळी प्रतिबंधित बाबींना सीमा क्षेत्रात जमावबंदी व टाळेबंदीसंदर्भात नियमावली आणि उपाययोजना ३० ...
शासन निर्देशाप्रमाणे कोविड-१९ साथरोगअंतर्गत ‘मिशन बिगीन अगेंन’नुसार वेळोवेळी प्रतिबंधित बाबींना सीमा क्षेत्रात जमावबंदी व टाळेबंदीसंदर्भात नियमावली आणि उपाययोजना ३० एप्रिलपर्यंत लागू केली आहे. जिल्हा प्रशासनाच्या निर्देशाप्रमाणे वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशातील सर्व निर्देश व सूचना अटी, शर्तींचे पालन करणे सर्व संबंधितांना बंधनकारक आहे, तसेच शासकीय कार्यालयात, शासकीय कंपन्यांत अभ्यागतांना भेटण्यासाठी परवानगी देण्यात येणार नाही. अपवादात्मक परिस्थितीत जर शासकीय कार्यालयात अभ्यागतांना भेटावयाचे असेल, तर अभ्यागतांना पास देण्याची सोय करण्यात आली आहे; परंतु त्यांच्याकडे ४८ तासांच्या आतील आरटीपीसीआरचे नकारात्मक प्रमाणपत्र असेल त्यांनाच कार्यालयात प्रवेश देण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. तरी तालुक्यातील नागरिकांनी दिलेल्या कालावधीत शासन निर्देशाचे पालन करणे अनिवार्य केले आहे. त्यानुसार नागरिकांनी नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन चामोर्शीचे तहसीलदार जितेंद्र शिकतोडे यांनी केले आहे.