नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा

By admin | Published: September 11, 2016 01:35 AM2016-09-11T01:35:05+5:302016-09-11T01:35:05+5:30

शासनाच्या वतीने शिबिर आयोजित करून नागरिकांना शासकीय योजनांची माहिती दिली जात आहे.

Citizens should take advantage of government schemes | नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा

नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा

Next

सागर कवडे यांचे आवाहन : रेगडी येथे जनजागरण मेळावा
घोट : शासनाच्या वतीने शिबिर आयोजित करून नागरिकांना शासकीय योजनांची माहिती दिली जात आहे. मेळाव्यात मिळालेल्या माहितीच्या आधारे नागरिकांनी शासकीय योजनांचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी केले.
पोलीस मदत केंद्र रेगडीच्या वतीने गावात आयोजित जनजागरण मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. सागर कवडे बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून चामोर्शी पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी खामकर, घोटचे वन परिक्षेत्र अधिकारी किरण पाटील, नायब तहसीलदार बावणे, विस्तार अधिकारी देवगडे, रेगडीचे सरपंच बाजीराव गावडे, उपसरपंच रमेश देवालवार, तंमुसचे अध्यक्ष देवराव खांडरे, विस्तार अधिकारी भोगे, घोटचे उपअभियंता अल्ली, रेगडीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गणवीर, प्रा. तिडके, गिरजाशंकर उपाध्ये, रेगडीचे प्रभारी अधिकारी नीलेश कदम, घोटचे प्रभारी अधिकारी सुरेश जायभाय, पोलीस उपनिरीक्षक इंगळे, बांगर, बिराजदार, एसआरपीचे जाधव उपस्थित होते.
नागरिकांनी आपल्या समस्या पोलिसांसमोर मांडाव्या तसेच शौचालयाची निर्मिती करून आपले गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही डॉ. सागर कवडे यांनी केले. शासकीय योजना प्रभावीपणे राबवून त्या नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपली आहे. त्यामुळे योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन किरण पाटील यांनी केले. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक प्रभारी अधिकारी नीलेश कदम, संचालन गरंजीचे मुख्याध्यापक विजय कारखेले तर आभार बांगर यांनी मानले. यशस्वीतेसाठी पोलीस कर्मचारी व नागरिकांनी सहकार्य केले. यावेळी बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Citizens should take advantage of government schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.