सर्पदंश टाळण्यासाठी नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:25 AM2021-06-25T04:25:49+5:302021-06-25T04:25:49+5:30
आरमोरी : पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्याने शेतात व घराच्या आजूबाजूच्या परिसरात अनेक प्रजातींच्या विषारी व बिनविषारी सापांचा वावर ...
आरमोरी : पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्याने शेतात व घराच्या आजूबाजूच्या परिसरात अनेक प्रजातींच्या विषारी व बिनविषारी सापांचा वावर जास्त प्रमाणात आढळतो. त्यामुळे सर्पदंश टाळण्यासाठी नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन आरमोरी येथील वन्यजीव संरक्षण संस्थेने केले आहे.
नुकतीच पावसाला सुरुवात झाली असून, शेतीच्या कामाला वेग आला आहे. पाऊसदेखील बऱ्यापैकी येत असल्याने बिळात लपून असलेले साप बिळात पाणी घुसल्याने बाहेर पडतात. शेतात गवताचे प्रमाण अधिक असल्याने त्या ठिकाणी दबा धरून बसतात. आपण न कळत त्यावरून चालतो किंवा गवत साफ करण्याचा प्रयत्न करतो. आपला हात आणि पाय त्याच्यासमोर गेल्याने तो आपला भक्ष्य समजून दंश करतो. अशाप्रकारे अपघात होऊन अनेक शेतकरी, शेतमजुरांना नाहक जीव गमवावा लागतो. त्यासाठी शेतावर जाताना हातात काठी ठेवावी. बांधावर, गवतात जाताना, गवत कापताना काठीने गवत हलवावे, जेणेकरून साप असेल, तर बाजूला निघून जाईल व अपघात टाळता येईल..
जिल्ह्यात एकूण १९ ते २० प्रकारचे साप आढळून येतात. त्यापैकी केवळ ५ साप विषारी आहेत. त्यामध्ये नाग, मण्यार, घोणस, फुरसे आणि पट्टेरी मण्यार हे विषारी साप असून, हरणटोळ, माजऱ्या, उडता सोनसर्प हे निमविषारी गटात मोडतात. याव्यतिरिक्त सर्व साप बिनविषारी आहेत. सापाची योग्य माहिती नसल्याने सर्पदंश झालेल्या अनेक लोकांचा केवळ धक्क्याने मृत्यू होताना दिसून येते. अशी माहिती वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्थेने दिली आहे.
काय दक्षता घ्यावी
पावसाळ्यात घराजवळील परिसर स्वच्छ ठेवावा, शिळे अन्न घराजवळ टाकू नये, बाहेर फिरताना पायात बूट किंवा चपलाचा वापर करावा, अंधारात बॅटरीचा वापर करावा, विटा, दगडाचे ढिगारे, पाला-पाचोळा साफ करताना योग्य ती काळजी घ्यावी. पाळीव प्राणी घरापासून दूर अंतरावर ठेवावेत. या बाबींची खबरदारी घेतल्यास सर्पदंश टाळता येतो..
सर्पदंश झाल्यास हे करावे
सर्पदंश झालेल्या व्यक्तीस मानसिक धीर द्यावा.
दंश झालेल्या व्यक्तीस कुठलेही खाद्यपदार्थ देऊ नये. उदा. चहा, काॅफी, दूध
दंशाच्या जागी चिरा देण्याचा प्रयत्न करू नये.
रुग्णाला जास्त हालचाल करू देऊ नये.
साप हाताला चावल्यास दंडाला, पायाला चावल्यास मांडीला दोरी बांधताना पेन, काडी, बोट टाकून घट्ट बांधावे. गाठ पडल्यानंतर घातलेली वास्तू बाहेर काढावी.
===Photopath===
240621\img-20210624-wa0036.jpg
===Caption===
घोणस जातीचा विषारी साप