धान राेवण्यांमुळे लसीकरणाकडे नागरिकांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:37 AM2021-07-28T04:37:54+5:302021-07-28T04:37:54+5:30
बाॅक्स ....... २६ जून ते २ जुलैच्या आठवड्यात विक्रमी लसीकरण २६ जून ते २ जुलै या आठवड्यात आजपर्यंतच्या कालावधीतील ...
बाॅक्स .......
२६ जून ते २ जुलैच्या आठवड्यात विक्रमी लसीकरण
२६ जून ते २ जुलै या आठवड्यात आजपर्यंतच्या कालावधीतील सर्वाधिक लसीकरण झाले असल्याचे दिसून येते. या आठवड्यात ४१ हजार १९७ नागरिकांनी पहिला डाेज, २ हजार ३४३ नागरिकांनी दुसरा डाेज घेतला आहे. त्यानंतर मात्र लस घेण्याचे प्रमाण कमी हाेण्यास सुरुवात झाली. त्यानंतरच्या आठवड्यात १४ हजार ८०२ नागरिकांनी पहिला डाेज तर १ हजार ९४८ नागरिकांनी दुसरा डाेज घेतला आहे.
बाॅक्स ....
एक दिवस घरी थांबणेही हाेते अशक्य
काेराेनाची लस घेतल्यानंतर अनेक नागरिकांनी अंगदुखीचा त्रास जाणवला. काही नागरिकांना तर थंडी वाजून तापसुद्धा येतो. सध्या धान राेवणीच्या हंगाम सुरू आहे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत शेतात काम करावे लागते. अशास्थितीत ताप आला म्हणून घरी थांबणे कठिण हाेते. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक नागरिक व शेतकरी लस घेण्यास तयार हाेत नसल्याचे दिसून येत आहे.
बाॅक्स ......
आठवडानिहाय लसीकरण
आठवडा लसीकरण
२९ मे ४ जून १४,१३५
५ जून ११ जून १४,६७५
१२ जून १८ जून १०,४१७
१९ जून २५ जून ३१,७७३
२६ जून २ जुलै ४३,५४०
३ जुलै ९ जुलै १६,७५०
१० जुलै १६ जुलै १६,६७२
१७ जुलै २३ जुलै १०,५२९
’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’
एकूण लसीकरण - ३,२२,७५९
पहिला डाेज - २,६७,२०५
दुसरा डाेज - ५५,५५४