एलईडी बल्बच्या प्रकाशाने उजळणार शहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 10:40 PM2019-01-28T22:40:37+5:302019-01-28T22:41:10+5:30

राज्याचा नगर विकास विभाग व गडचिरोली नगर पालिका प्रशासनाच्या पुढाकाराने शहरातील प्रमुख तसेच अंतर्गत मार्गावरील खांबावर एलईडी बल्ब बसविण्यात येणार आहेत. याबाबतचे संपूर्ण नियोजन पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले असून संपूर्ण शहरभर जवळपास चार हजार एलईडी बल्ब लावले जाणार आहेत. बल्ब लावण्याचे काम मंगळवारपासून सुरू होणार आहे. हे काम पूर्ण झाल्यावर शहरातील पथमार्ग एलईडी बल्बच्या लख्ख प्रकाशाने उजळणार आहे.

The city lights up the light of the LED bulb | एलईडी बल्बच्या प्रकाशाने उजळणार शहर

एलईडी बल्बच्या प्रकाशाने उजळणार शहर

googlenewsNext
ठळक मुद्देचार हजार बल्ब लागणार : वीज बिल बचतीसाठी नगर विकास विभाग व पालिकेचा पुढाकार

दिलीप दहेलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्याचा नगर विकास विभाग व गडचिरोली नगर पालिका प्रशासनाच्या पुढाकाराने शहरातील प्रमुख तसेच अंतर्गत मार्गावरील खांबावर एलईडी बल्ब बसविण्यात येणार आहेत. याबाबतचे संपूर्ण नियोजन पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले असून संपूर्ण शहरभर जवळपास चार हजार एलईडी बल्ब लावले जाणार आहेत. बल्ब लावण्याचे काम मंगळवारपासून सुरू होणार आहे. हे काम पूर्ण झाल्यावर शहरातील पथमार्ग एलईडी बल्बच्या लख्ख प्रकाशाने उजळणार आहे.
नगर विकास विभागाने या संदर्भात ४ जून २०१८ रोजी नवा शासन निर्णय निर्गमित केला. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी ऊर्जा बचतीसाठी एलईडी पथदिवे बसविण्यासाठी ईईएसएल या कंपनीशी करारनामा केला आहे. ईईएसएलच्या माध्यमातून एस्को तत्वावर एलईडी पथदिवे बसविण्याच्या कामात स्थानिक स्वराज्य संस्थेस सुरूवातीला कोणतीही भांडवली गुंतवणूक करावी लागणार नाही.
त्यामुळे एलईडी पथदिवे बसविण्यासाठी शासनाच्या निधीसोबतच चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून अथवा स्वनिधीतून कोणताही भांडवली खर्च करण्यास प्रतिबंध राहिल, असे नगर विकास विभागाच्या शासन निर्णयात नमूद आहे.
सदर एलईडी बल्ब लावण्यासाठीच्या कामाचा करारनामा गडचिरोली पालिकेच्या वतीने संबंधित ईईएसएल या कंपनीशी करण्यात आला आहे. गडचिरोली पालिकेच्या हद्दित १३ प्रभाग असून २५ वार्ड आहेत. सर्व प्रभाग मिळून वार्डावार्डात एकूण ३ हजार ६६३ एलईडी बल्ब लावण्यात येणार आहे.
यामध्ये प्रभाग क्रमांक १ मधील सर्व खांबांवर २०८, प्रभाग क्रमांक २ मध्ये ३२२, प्रभाग क्रमांक ३ मध्ये २५३, प्रभाग क्रमांक ४ मध्ये १९४, प्रभाग क्रमांक ५ मध्ये ५५२, प्रभाग क्रमांक ६ मध्ये २२०, प्रभाग क्रमांक ७ मध्ये २४५, प्रभाग क्रमांक ८ मध्ये १२०, प्रभाग क्रमांक ९ मध्ये २००, प्रभाग क्रमांक १० मध्ये २५८, प्रभाग क्रमांक ११ मध्ये ६१५ आणि प्रभाग क्रमांक १२ मध्ये सर्व खांबावर ४७६ एलईडी बल्ब लावण्यात येणार आहे.
विजबिलापोटी आर्थिक बचत व्हावी. अवाजवी विजबिलाचा नगर पालिकेवर भार पडू नये, यासाठी राज्याच्या नगर विकास विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत सर्व शहरांमध्ये एलईडी बल्ब बसविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एलईडी बल्बच्या वापराने विजबिल निम्म्यापेक्षा कमी होत असल्याचा अनुभव आहे.
देखभाल दुरूस्तीची जबाबदारी कंपनीवर
शहरातील खांबांवर एलईडी पथदिवे बसविण्याचे काम शासन स्तरावरून ईईएसएल कंपनीला सोपविले आहे. करारनामा व इतर सर्व प्रशासकीय कार्यवाही पूर्ण झाली असून हे बल्ब लावण्याचे काम मंगळवारपासून सुरू होणार आहे. बल्बच्या देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी पाच वर्षापर्यंत संबंधित कंपनीवर सोपविण्यात आली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे पालिकेचा वीज पुरवठा व देखभाल दुरूस्तीसाठी दरवर्षी येणारा लाखो रूपयांचा खर्च वाचणार आहे. आता नगर पालिकेच्या वतीने केवळ आवश्यक त्या ठिकाणी नवीन खांब उभारून वीज पुरवठा जोडण्याचे काम निविदा प्रक्रिया राबवून करण्यात येणार आहे.
१३४ खांबावर राहणार २५१ बल्ब
शहराच्या मुख्य मार्गावरील वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीने काही वर्षापूर्वी दुभाजक उभारण्यात आले. आरमोरी, चामोर्शी, धानोरा व चंद्रपूर या चारही मार्गावर एकूण १३४ खांब आहेत. काही खांबावर एक तर काही खांबावर दोन बल्बची व्यवस्था करण्यात आली आहे. या १३४ खांबावर एकूण २५१ एलईडी बल्ब बसविण्यात येणार आहे.
हायमास्टवर १९० वॅटचे बल्ब
गडचिरोली शहरात मोक्याच्या व वर्दळीच्या ठिकाणी मिळून एकूण सहा हायमास्ट लाईट बसविण्यात आले आहेत. या हायमास्टवर १९० वॅटचे एलईडी बल्ब बसविण्यात येणार आहेत. यामध्ये इंदिरा गांधी चौक, बसस्थानक चौक, रेड्डी गोडाऊन चौक, कारगिल चौक, आयटीआय चौक व कॉम्प्लेक्स भागातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसराचा समावेश आहे. हे सहाही ठिकाणचे चौक एलईडी बल्बने प्रकाशणार आहेत.

Web Title: The city lights up the light of the LED bulb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.