महर्षी वाल्मिकीच्या पालखीने शहर दुमदुमले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 12:27 AM2018-10-25T00:27:44+5:302018-10-25T00:31:00+5:30

जय वाल्मिकी केवट/ढिवर मंडळ चामोर्शीच्या वतीने बुधवारी महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव तथा समाज प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महर्षी वाल्मिकी मंदिर चौकातून शहरातून महर्षी वाल्मिकी यांची पालखी मिरवणूक काढण्यात आली.

City of Maharishi Valmiki's palanquin | महर्षी वाल्मिकीच्या पालखीने शहर दुमदुमले

महर्षी वाल्मिकीच्या पालखीने शहर दुमदुमले

Next
ठळक मुद्देचामोर्शीत जयंती उत्सव व समाज प्रबोधन मेळावा : शहर व तालुक्यातील केवट, ढिवर, भोई समाज एकवटला

लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : जय वाल्मिकी केवट/ढिवर मंडळ चामोर्शीच्या वतीने बुधवारी महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव तथा समाज प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महर्षी वाल्मिकी मंदिर चौकातून शहरातून महर्षी वाल्मिकी यांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. या पालखीने अख्खे चामोर्शी शहर दुमदुमले.
केवट/ढिवर (भोई) समाजाचे आराध्य दैवत महर्षी वाल्मिकी ऋषी यांची पालखी व मिरवणूक स्थानिक मच्छीमार्केटमधून वाळंवटी चौक, मुख्य बाजारपेठ, तेलंग मोहल्ला, राममंदिर, माता मंदिरमार्गाने काढण्यात आली. त्यानंतर सदर पालखीचा समारोप चौकातील महर्षी वाल्मिकी मंदिरात करण्यात आला.
मंगळवारी सायंकाळी ६ वाजता घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर बुधवारी १२ वाजता समाप्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला. यानंतर दुपारी ३.३० वाजता पालखी मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी ६ वाजता महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
समाजप्रबोधन कार्यक्रमाचे उद्घाटन नगरपंचायतीचे उपाध्यक्ष राहुल नैताम यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्रज्ञा उराडे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त संवर्ग विकास अधिकारी बी.जे.सातार, न.पं.च्या महिला व बालकल्याण सभापती मंदा सरपे, नगरसेविका कविता किरमे, सामाजिक कार्यकर्ते बाबुराव बावणे, सेवानिवृत्त उपकार्यकारी अधिकारी काशिनाथ दुमाने, सेवानिवृत्त मुख्य लेखाधिकारी एन.डी.मेश्राम, माजी उपव्यवस्थापक विजय घुग्गुसकर, सेवानिवृत्त मंडळ अधिकारी जी.व्ही.डोंगरे, पत्रकार संघाचे अध्यक्ष लोमेश बुरांडे, पोलीस पाटील यामिनी भोयर, हरीष गेडाम, सुरेश गट्टे, महादेव कोसमशिले, मच्छींद्र सातारे, कान्हू कोसमशिले, राजू राऊत, विलास महामंडरे, बंडू राऊत, विलास सरपे, मंगेश सातारे, आनंद सरपे, विठ्ठल शिंदे, नारायण कस्तुरे, अतुल कस्तुरे, शीतल शिंदे, मंदा मंडरे, सुनीता सरपे, गयाबाई राऊत, गीता गट्टे, ललीता वाघाडे, राईबाई कोसमशिले, लता महामंडरे, चंद्रकला सातारे, कविता राऊत, शशी सातारे, सुमित्रा शिंदे, वनमाला सरपे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन व आभार मंडळ अधिकारी सुभाष सरपे यांनी केले. विशेष म्हणजे केवट/ढिवर समाजाच्या वतीने यंदा पहिल्यांदाच शहरातून महर्षी वाल्मिकी यांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. यशस्वीतेसाठी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजबांधवांनी सहकार्य केले.
समाजबांधवांनी संघटित राहण्याचे आवाहन
महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव तथा प्रबोधन मेळाव्यात नगराध्यक्ष प्रज्ञा उराडे, उपाध्यक्ष राहुल नैताम, सेवानिवृत्त बीडीओ बी.जे.सातार यांच्यासह अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले. समाजातील विविध प्रश्न व समस्या शासनदरबारी मार्गी लावायचे असेल तर समाज संघटीत असणे आवश्यक आहे. त्यामुळे केवट/ढिवर (भोई) समाजाने कायम संघटीत राहून शासनदरबारी लढा दिला पाहिजे, असे आवाहन मान्यवरांनी केले.
समाजाच्या वतीने अशाप्रकारचे प्रबोधन मेळावे दरवर्षी आयोजित केले पाहिजे, असे आवाहन मान्यवरांनी केले.
यंदा प्रथमच चामोर्शी शहरातील केवट समाजाने एकत्र येऊन मेळावा घेतला. कार्यक्रमाच्या निमित्ताने या समाजाने आपली ताकद दाखविली. ही ताकद अशीच कायम राहिली पाहिजे, जेणे करून आपले अधिकार व हक्क मिळविण्यास सोयीचे होईल. तेव्हा सर्व समाजबांधवांनी आपसातील मतभेद दूर करून समाजाच्या विकासासाठी पुढे आले पाहिजे, असे अनेक मान्यवरांनी सांगितले.
शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, त्यामुळे समाजातील युवकांनी उच्च शिक्षणाकडे वळावे, असे आवाहन नगराध्यक्ष उराडे यांनी यावेळी केले.

Web Title: City of Maharishi Valmiki's palanquin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.