शहरात स्वच्छतेचा जागर सुरू
By admin | Published: November 4, 2016 12:20 AM2016-11-04T00:20:38+5:302016-11-04T00:20:38+5:30
गडचिरोली नगर पालिकेच्या क्षेत्रात आचारसंहितेच्या काळात महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छता
सेलिब्रेटीचे संदेश झळकले : गडचिरोलीत कचरा मात्र पडूनच
गडचिरोली : गडचिरोली नगर पालिकेच्या क्षेत्रात आचारसंहितेच्या काळात महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छता अभियानाची जनजागृती करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर फलक लावण्यात आले आहे. या फलकांवर सेलिब्रेटीच्या छायाचित्रासह स्वच्छतेचा संदेश देण्यात आला आहे. त्यामुळे हे फलक नागरिकांच्या आकर्षनाचे केंद्रबिंदू ठरले आहे.
क्रीडापटू व अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडू अंजली भागवत यांचे छायाचित्र असलेले फलक शहराच्या विविध भागामध्ये लावण्यात आले आहे. ‘एक कदम स्वच्छता की ओर’ असा संदेश याद्वारे देण्यात आला आहे. आचारसंहिता लागल्यामुळे शहरातील सर्व भागातील राजकीय नेत्यांचे व पक्षाचे फलक काढून टाकण्यात आल्याने शहर सध्या मोकळा श्वास घेत आहे. त्यातच गडचिरोली नगर पालिकेने विविध ठिकाणी हे फलक लावल्याने हे फलक नागरिकांचे लक्ष्य वेधून घेत आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक, तरूण थांबून या फलकाचे अवलोकन करताना शहरात दिसून येत आहे. मात्र या फलकाच्या परिसरात काही भागात कचऱ्याचे ढीग कायम पडून आहेत. याकडे गडचिरोली नगर पालिकेने लक्ष द्यावे, अशी मागणी शहरात सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांकडून करण्यात आली आहे. एकूनच स्वच्छतेचा जागर यानिमित्ताने सुरू झाला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)