गावागावांत स्वच्छता अभियान झाले अधिक तीव्र

By admin | Published: November 12, 2014 10:44 PM2014-11-12T22:44:46+5:302014-11-12T22:44:46+5:30

जिल्ह्यात स्वच्छता अभियान जोरात राबविले जात आहे. अनेक गावांमध्ये तालुकास्तरावरील स्वच्छता अभियानाची सुरूवात केली जात असल्याने सध्य:स्थितीत गावागावात स्वच्छता अभियान

Cleanliness drive was more intense in the village | गावागावांत स्वच्छता अभियान झाले अधिक तीव्र

गावागावांत स्वच्छता अभियान झाले अधिक तीव्र

Next

गडचिरोली : जिल्ह्यात स्वच्छता अभियान जोरात राबविले जात आहे. अनेक गावांमध्ये तालुकास्तरावरील स्वच्छता अभियानाची सुरूवात केली जात असल्याने सध्य:स्थितीत गावागावात स्वच्छता अभियान तीव्र झाल्याचे दिसून येत आहे. आरमोरी तालुकास्तरीय स्वच्छता अभियानाची सुरूवात ठाणेगाव येथून करण्यात आली.
ठाणेगाव : आरमोरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ठाणेगावात तालुकास्तरीय ग्राम स्वच्छता अभियानाची सुरूवात करण्यात आली. यावेळी गावातील नागरिकांनी मुख्य रस्त्याची पूर्णत: स्वच्छता केली. गावालगत असलेल्या प्राचीनकालिन हेमांडपंथी मंदिराची साफसफाई केली. यावेळी ग्रामविकास अधिकारी ए. टी. भांडेकर, आरमोरी ग्रा. प. चे डाकरे, माकडे, ग्रा. प. सदस्य राजू भुरसे, छत्रपती उपरिकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुरेंंद्र जुवारे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोपाल भांडेकर, हिराजी कुनघाडकर, अनिल नैताम, महेश किरमे, राहूल भांडेकर, जितेंद्र सोनटक्के, नितेश मेश्राम, तुषार कत्रे, निकेश कत्रे, रामेश्वर चिचघरे, सतीश कुनघाडकर उपस्थित होते.
अरसोडा : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम अभियानाच्या माध्यमातून पंचायत समिती आरमोरी अंतर्गत येणाऱ्या अरसोडा येथे ग्राम स्वच्छता अभियान जिल्हा परिषद शाळा तसेच गाावकऱ्यांच्यावतीने राबविण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी गावातील अनेक वॉर्डात स्वच्छता उपक्रम राबविला. यावेळी ग्राम स्वच्छता समितीचे अध्यक्ष देविदास चौधरी, सुनिता कुथे, तंमुस अध्यक्ष गणेश प्रधान, देवा खोब्रागडे, माजी सरपंच शालिकराम पत्रे, शाळा व्यवस्थान समितीचे अध्यक्ष लहानु पिल्लारे, विस्तार अधिकारी देव्हारे, मुख्याध्यापिका हेमके, ग्राम सेवक, कर्मचारी उपस्थित होते.
कोरेगाव : देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव येथे ग्राम पंचायत कार्यालय, किसान विद्यालय, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी केंद्राच्यावतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी गावातून रॅली काढण्यात आली. राष्ट्रीय स्वच्छता अभियान, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, निर्मल भारत अभियान, दलित वस्ती सुधार अभियानांतर्गत गावात अभियानरथ तयार करून रॅली काढण्यात आली. दरम्यान गावातील मुख्य रस्त्याची साफसफाई करण्यात आली. यावेळी सरपंच ममिता आळे, प्राचार्य मुंगमोडे, मुख्याध्यापिका कुलिगायत, जगदिश सहारे, लेमराव गायकवाड, महानंदा राऊत, जी. के. पिल्लारे, प्रशांत किलनाके, गोपिका सहारे सहभागी झाले होते. १५ नोव्हेंबरपासून गावात ग्रामसेवक संघटनेतर्फे कचरा निर्मूलन कार्यकम राबविला जाणार आहे. कार्यक्रमाचे संचालन व आभार सुरेश पर्वतकर यांनी केले. रामेश्वर चौधरी, अरूण राजगिरे, संजय वाघाडे, रमेश मेश्राम यांनी सहकार्य केले.

Web Title: Cleanliness drive was more intense in the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.