‘त्या’ लिपिक युवतीची हत्या प्रेमसंबंधातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 12:20 AM2019-07-26T00:20:10+5:302019-07-26T00:20:33+5:30

येथील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेत (डीआरडीए) लिपीक पदावर कार्यरत युवतीच्या हत्येप्रकरणी अखेर पोटेगाव पोलिसांनी नामदेव दागोची भोगे (३८) या शिक्षकाला अटक केली आहे. तो कोरची तालुक्यातील बेतकाठी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहे.

'That' clergy woman murdered by love | ‘त्या’ लिपिक युवतीची हत्या प्रेमसंबंधातून

‘त्या’ लिपिक युवतीची हत्या प्रेमसंबंधातून

Next
ठळक मुद्देआरोपी शिक्षकाला अटक : गळा चिरून मृतदेह फेकला नाल्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : येथील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेत (डीआरडीए) लिपीक पदावर कार्यरत युवतीच्या हत्येप्रकरणी अखेर पोटेगाव पोलिसांनी नामदेव दागोची भोगे (३८) या शिक्षकाला अटक केली आहे. तो कोरची तालुक्यातील बेतकाठी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहे.
कारवाफा येथील मूळ रहिवासी असलेली चंद्रभागा देवराव अप्पलवार (३२) ही अविवाहित युवती लिपीक पदावर कार्यरत होती. तिचे नामदेव भोगे या शिक्षकासोबत प्रेमसंबंध होते. तो कार्यालयात तिला भेटायला येत होता. तो विवाहित असून त्याला एक मुलगा आहे. मागील काही दिवसांपासून आरोपी नामदेव भोगे व मृतक चंद्रभागा यांच्यामध्ये खटके उडत होते. यातूनच आरोपीने चंद्रभागाची कटकट दूर करण्यासाठी तिची हत्या करण्याचा निर्णय घेतला.
१५ जुलैपासून चंद्रभागा गायब होती. १७ जुलै रोजी पोटेगाव नजीकच्या पोहार नाल्याच्या पात्रात तिचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनास्थळापासून काही दूर अंतरावर तिची स्कूटी सुध्दा आढळली होती. पोलिसांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यालयात जाऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपीचा छडा लागला. आरोपी हा नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील मूळ रहिवासी आहे. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
लोकमतनेच सर्वप्रथम त्या युवतीची हत्या प्रेमसंबंधातून झाल्याचा अंदाज व्यक्त केला होता.

Web Title: 'That' clergy woman murdered by love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून