पालिकांची माहिती मिळणार क्लिकवर

By admin | Published: October 16, 2015 01:52 AM2015-10-16T01:52:24+5:302015-10-16T01:52:24+5:30

राज्य शासनाच्या निर्देशानुसार गडचिरोली व देसाईगंज नगर परिषदांनी स्वत:चे पोर्टल तयार केले असून या पोर्टलवर नागरिकांना उपयोगी पडणारी नगर परिषदेची माहिती अपलोड करण्यात आली आहे.

Click Here | पालिकांची माहिती मिळणार क्लिकवर

पालिकांची माहिती मिळणार क्लिकवर

Next

स्वतंत्र पोर्टलची निर्मिती : देसाईगंज व गडचिरोली नगर परिषद
दिगांबर जवादे गडचिरोली
राज्य शासनाच्या निर्देशानुसार गडचिरोली व देसाईगंज नगर परिषदांनी स्वत:चे पोर्टल तयार केले असून या पोर्टलवर नागरिकांना उपयोगी पडणारी नगर परिषदेची माहिती अपलोड करण्यात आली आहे. सदर माहिती आता नागरिकांना घर बसल्या मोबाईल किंवा संगणकाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. त्यामुळे माहितीसाठी वेळोवेळी नगर परिषदेच्या चकरा मारण्याची पाळी नागरिकांवर येणार नाही.
राज्य शासनाने ई-गव्हर्नर्सचे धोरण अवलंबिले आहे. त्यानुसार प्रत्येक कार्यालयाचे संगणकीकरण करण्याचे काम सुरू केले आहे. शासनाच्या या धोरणानुसार गडचिरोली व देसाईगंज या दोन्ही नगर परिषदेत पोर्टलवर माहिती अपलोड करण्याच्या कामाला २०१३ पासून सुरुवात झाली. माहिती अपलोड करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर गडचिरोली नगर परिषदेचे (ल्लंँ१स्रं१्र२ँंँिूिँ्र१ङ्म’्र.ङ्म१ॅ) या नावाचे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलवर मालमत्तेशी संदर्भातील माहिती टाकण्यात आली आहे. त्याचबरोबर किती वर्षांचे मालमत्तेसंदर्भातील कर शिल्लक आहे, चालू वर्षातील कर आदी बाबतची माहिती उपलब्ध होणार आहे. नगर परिषदेमध्ये जन्म व मृत्यूची नोंद केली असल्यास त्याचा दाखला नागरिकांना उपलब्ध होणार आहे. सदर दाखला मिळण्यासाठी आॅनलाईन पद्धतीनेच अर्ज करण्याची सुविधा सुद्धा या पोर्टलमध्ये उपलब्ध होणार आहे. दाखला मात्र संबंधित व्यक्तीला कार्यालयामध्ये जाऊनच घ्यावा लागणार आहे. पाणीपुरवठा कर, टाऊंट प्लॉनिंग, बांधकाम मंजुरी यांच्यासह शिक्षण विभाग आदी संदर्भातील माहितीसुद्धा उपलब्ध होणार आहे.
आॅनलाईन पद्धतीने घरबसल्या एखाद्या दाखल्यासंदर्भात अर्ज करता येणार आहे. अर्ज केल्यानंतर त्या अर्जावर नगर परिषदेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी कोणती कार्यवाही केली, सदर अर्ज कोणत्या स्टेपवर आहे, याचीही माहिती उपलब्ध होणार असल्याने कार्यालयीन कामकाज गतिमान होण्यास मदत होईल. त्याचबरोबर एकाच माहितीसाठी वेळोवेळी नगर परिषदेच्या माराव्या लागणाऱ्या नागरिकांच्या चकरासुद्धा बंद होण्यास मदत होईल. परिणामी वेळ व श्रमाची बचत होण्यास फारमोठी मदत होणार आहे.

अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
पोर्टल तयार करण्याचे काम एका खासगी कंपनीला दिले आहे. संबंधित कंपनीचे कर्मचारी नगर परिषदेच्या कार्यालयात उपस्थित राहून कर्मचारी व अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. दोन्ही नगर परिषदांमध्ये कंपनीने प्रत्येकी दोन कर्मचाऱ्यांची नेमणूक केली असून हे कर्मचारी विभागनिहाय येणाऱ्या अडचणी जाणून त्या-त्या विभागाच्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.

देसाईगंजचे पोर्टल प्रगतीपथावर
देसाईगंज नगर परिषदेच्या दस्तावेजांची माहिती संगणकीकृत तयार करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. या नगर परिषदेने (६ं२िंल्लस्र.ङ्म१ॅ) या नावाने पोर्टलसुद्धा रजिस्टर्ड केले आहे. बीएसएनएलची मान्यता मिळणे फक्त बाकी आहे. बीएसएनएलच्या मान्यतेनंतर सदर पोर्टलसुद्धा येत्या १५ दिवसांत सुरू होईल, अशी माहिती तेथील अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे. पोर्टल सुरू झाल्यानंतर देसाईगंज येथीलही नागरिकांना नगर परिषदेशी संदर्भातील माहिती उपलब्ध होणार आहे.

पोर्टल अपडेट ठेवणे आवश्यक
शासनाच्या धोरणानुसार राज्यभरातील पंचायत समिती, नगर परिषद, जिल्हा परिषद व विविध विभागांच्या वेबसाईट तयार करण्यात आल्या आहेत. मात्र या वेबसाईट अपडेट करण्यासाठी कर्मचारीच नियुक्त केले जात नाही. त्यामुळे मागील दहा वर्षांपासून या वेबसाईटमध्ये बदल झाला नाही. एवढेच नाही तर बहुतांश अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वत:च्या विभागाची वेबसाईट आहे, हे सुद्धा माहित नाही. हे टाळण्यासाठी न. प. ने स्वतंत्र कर्मचारी नेमणे आवश्यक आहे.

Web Title: Click Here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.