डीबीटी योजना बंद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 01:40 AM2018-08-11T01:40:53+5:302018-08-11T01:42:24+5:30
वसतिगृहात राहत असलेल्या विद्यार्थ्यांच्या खात्यात रोख रक्कम (डीबीटी) जमा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. मात्र या अंतर्गत कमी रक्कम दिली जात आहे. त्यामुळे सदर योजना बंद करून पूर्वीप्रमाणेच वसतिगृहातच जेवणाची व्यवस्था करावी, अशी मागणी गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिल्हाध्यक्ष संदीप वरखडे यांनी राज्यपालांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : वसतिगृहात राहत असलेल्या विद्यार्थ्यांच्या खात्यात रोख रक्कम (डीबीटी) जमा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. मात्र या अंतर्गत कमी रक्कम दिली जात आहे. त्यामुळे सदर योजना बंद करून पूर्वीप्रमाणेच वसतिगृहातच जेवणाची व्यवस्था करावी, अशी मागणी गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिल्हाध्यक्ष संदीप वरखडे यांनी राज्यपालांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
डीबीटी योजनेंतर्गत वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना महिन्याकाठी तीन हजार ते ३ हजार ५०० रूपये दिले जातात. सदर योजना विभागीय जिल्हा व तालुकास्तरावरील वसतिगृहांसाठी सुरू केली आहे. मात्र विद्यार्थ्यांचा एका दिवशीचा जेवण, नास्ता व दुधाचा खर्च ५०० रूपयांच्या जवळपास आहे. त्या तुलनेत विद्यार्थ्यांना मिळणारी रक्कम बरीच कमी आहे. मेसमध्ये जेवण करण्यासाठी जावे लागेल, यामुळे त्यांच्या अभ्यासाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. पैशाचा दुरूपयोग सदर विद्यार्थी व त्याच्या पालकाकडून होण्याची शक्यता आहे. या सर्व त्रुटी लक्षात घेऊन डीबीटी योजना बंद करावी व पूर्वीप्रमाणेच जेवनाची व्यवस्था करावी, अशी मागणी संदीप वरखडे, राजेंद्र मेश्राम, सुरज मडावी, दिवाकर निसार, सुकलू पोरेटी यांनी केली आहे.