अहेरी बाजारपेठेत कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 10:30 PM2019-01-06T22:30:04+5:302019-01-06T22:30:33+5:30
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व अहेरी येथील नागरिक श्रीनिवास भिमन्ना संगमवार यांच्यात जमिनीवरून वाद आहे. या वादातून राजकीय वातावरण तापल्याने रविवारी अहेरी येथील बाजारपेठ दिवसभर बंद ठेवण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व अहेरी येथील नागरिक श्रीनिवास भिमन्ना संगमवार यांच्यात जमिनीवरून वाद आहे. या वादातून राजकीय वातावरण तापल्याने रविवारी अहेरी येथील बाजारपेठ दिवसभर बंद ठेवण्यात आली.
श्रीनिवास संगमवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ४ जानेवारी रोजी आम्ही आमच्या भूमापन क्रमांक ७७७ वर असलेल्या वडिलोपार्जित जमिनीवर उभे असताना जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार हे काही युवकांसोबत त्या ठिकाणी आले. त्यांच्याकडे लोखंडी सळाख, सब्बल व कुºहाड होती. आम्ही तयार केलेले तारेचे कुंपन तोडून जमिनी आमच्या जागेत प्रवेश केलाा. आम्हाला अश्लिल भाषेत शिविगाळ करून जागेवरील ताबा काढण्यास बजाविले. माझे वडिल भिमन्ना संगमवार यांनी कोणालाही जागा विकली नाही. त्यामुळे अजय कंकडालवार यांनी कुंपन तोडण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. संबंधित जागेचे पुरावे माझ्याकडे आहेत. कंकडालवार यांनी माझ्या शर्टची कॉलर पकडली. सोन्याची चैन तोडली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. कंकडालवार यांनी तोरेचे कुंपन, सिमेंट खांब काढून नेले. कंकडालवार हे पदाचा गैरवापर करीत आहेत, असा आरोप पत्रकार परिषदेत केला. या वैयक्तिक वादातून अहेरी येथील राजकीय वातावरण तापले. रविवारी सकाळपासून बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती.
श्रीनिवास संगमवार यांचे वडिल भिमन्ना संगमवार यांनी सदर जागा नारायण सुरमवार यांना विकली. सुरमवार यांच्याकडून ती जागा मी खरेदी केली. त्यामुळे दुसऱ्यांच्या जागेवर जबरीने ताबा मिळविण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. संगमवार यांनीच माझ्या जागेवर रातोरात अतिक्रमण केले. आजही त्या जागेवर नारायण सुरमवार यांचा शौचालय व बाथरूम आहे. मी किंवा माझ्या सहकाºयांनी मारहाण केली नाही. पुरावे हे ठाणेदारांना दाखविले आहेत. काही व्यक्तींनी माझ्या विरोधात षडयंत्र रचले आहे.
- अजय कंकडालवार,
जि.प. उपाध्यक्ष
अहेरी बंदबाबत पोलीस स्टेशनला कोणतेच अर्ज प्राप्त झाले नाही. मारहाण प्रकरणी संगमवार यांच्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर प्रकरण हे दिवाणी स्वरूपाचे आहे.
- सतीश होडगर, पोलीस निरिक्षक, अहेरी