जंकास संस्थांना कूप कामांचे वाटप
By admin | Published: November 1, 2014 12:53 AM2014-11-01T00:53:36+5:302014-11-01T00:53:36+5:30
२०१४-१५ या वर्षातील बांबू कामांचे दर ठरविण्यासाठी स्थानिक सामाजिक न्याय भवनातील प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक कार्यालयात ...
गडचिरोली : २०१४-१५ या वर्षातील बांबू कामांचे दर ठरविण्यासाठी स्थानिक सामाजिक न्याय भवनातील प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक कार्यालयात ३१ आॅक्टोबर रोजी जंगल कामगार सहकारी संस्थांची सभा पार पडली. या सभेमध्ये १६ जंगल कामगार सहकारी संस्थांना ४८३.३२ लाख रूपयांच्या ३२ कूप कामांचे वाटप करण्यात आले.
वेतनी मंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी गडचिरोली वनवृत्ताचे मुख्य प्रादेशिक वनसंरक्षक टी. एस. के. रेड्डी होते. यावेळी सभेला चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य प्रादेशिक वनसंरक्षक संजय ठाकरे, गडचिरोली वन विभागाच्या उपवनसंरक्षक श्रीलक्ष्मी अनबत्तुल्ला, वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, आलापल्ली वनविभागाचे उपवनसंरक्षक मिना, ब्रह्मपुरी वनविभागाचे उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, सिरोंचा वनविभागाचे उपवनसंरक्षक शुक्ला, विभागीय वनाधिकारी पाटील, विभागीय वनाधिकारी डहाट, जिल्हा संघाचे अध्यक्ष तथ माजी खा. मारोतराव कोवासे, उपाध्यक्ष पूर्णचंद्रराव रायसिडाम, राज्य संघाचे उपाध्यक्ष हरिराम वरखडे, गडचिरोली जंकासचे अध्यक्ष घनश्याम मडावी, सचिव एम. झेड. जांभुळकर आदी उपस्थित होते. यावेळी माजी खा. कोवासे यांनी जंगल कामगार सहकारी संस्थांना भेडसावणाऱ्या अडचणी मांडल्या. यावेळी मुख्य वनसंरक्षक टी. एस. के. रेड्डी यांनी वेतन मंडळासाठी समिती गठित करून निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. (शहर प्रतिनिधी)