किनाऱ्याचा मंदिराला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 01:28 AM2017-12-20T01:28:02+5:302017-12-20T01:32:27+5:30
मार्कंडादेव देवस्थानातील मंदिरे अत्यंत पुरातन असल्याने या स्थळाला भेट देण्यासाठी भाविकांसोबतच पर्यटकही येतात. मार्कंडादेव येथील मंदिरे वैनगंगा नदीच्या अगदी किनाऱ्यांवर आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : मार्कंडादेव देवस्थानातील मंदिरे अत्यंत पुरातन असल्याने या स्थळाला भेट देण्यासाठी भाविकांसोबतच पर्यटकही येतात. मार्कंडादेव येथील मंदिरे वैनगंगा नदीच्या अगदी किनाऱ्यांवर आहेत. दिवसेंदिवस नदी किनारा कोसळत चालला आहे. त्यामुळे मंदिराला धोका निर्माण झाला आहे. नदी किनाऱ्यावर पायऱ्यांची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी मार्कंडादेवच्या सरपंच उज्ज्वला गायकवाड व पोलीस पाटील आरती आभारे यांनी केली आहे.
प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत मार्कंडादेवच्या विकासासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये टॅक्सी पार्किंगच्या बांधकामासाठी ३२ लाख रूपये, पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण करण्यासाठी ९.९५ लाख रूपये, निरीक्षण मनोेरा बांधकामासाठी ३१ लाख ५४ हजार, नदी किनारा विकासासाठी ९९ लाख ५१ हजार, सुलभ शौचालय बांधण्यासाठी १९ लाख ९० हजार, बंद गटार बांधकामासाठी ७ लाख १० हजार रूपये मंजूर केले आहेत. या कामांचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते भूमीपूजनही करण्यात आले. यापैैकी सुलभ शौचालयाचे काम पूर्ण झाले. परंतु हस्तांतरित झाले नाही. पार्र्किंग सुविधेचे काम सुरू झाले आहे. इतर कामे मात्र सुरू झाली नाही. यामध्ये महत्त्वपूर्ण काम म्हणजे किनाºयावर पायºया बांधण्याचे आहे. पायºयांचे बांधकाम झाल्यास किनारा खचण्यापासून वाचविता येईल.
मार्कंडेश्वराच्या दर्शनासाठी आलेले बहुतांश भाविक नदीमध्ये आंघोळ करण्यासाठी जातात. पायºया नसल्याने नदीत उतरताना व चढताना भाविकांना त्रास होतो. पायऱ्यांचे बांधकाम झाल्यास भाविकांसाठी सोयीचे होणार आहे. विशेष करून महाशिवरात्रीला भरणाऱ्या जत्रेदरम्यान हजारो भाविक मार्र्कंडादेव येथे येतात. नदीपात्रात जाण्यासाठी मोठी गर्दी निर्माण होते. पायऱ्यांचे बांधकाम झाल्यास भाविकांसाठी सुद्धा सोयीचे होणार असल्याने जत्रेपूर्वी बांधकाम करण्याची मागणी आहे.
इतर कामेही रखडली
राज्य शासनाने मार्कंडादेव मंदिर परिसराच्या विकासासाठी निधी मंजूर केला आहे. मात्र निरीक्षण मनोरा, पिण्याच्या पाण्याची सुविधा, टॅॅक्सी पार्र्किंग सुविधा आदी कामांना अजूनपर्यंत सुरुवात झाली नाही. याकडे शासनाने लक्ष घालून बांधकामाला सुुरुवात करावी, अशी मागणी सरपंच उज्ज्वला गायकवाड व पोलीस पाटील आरती आभारे यांनी केली आहे.