चर्मकार समाजाला व्यवसायासाठी मिळणार कर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 03:46 PM2024-07-13T15:46:44+5:302024-07-13T15:48:35+5:30

कर्ज हवे? प्रस्ताव करा सादर : संत रोहिदास चर्मोद्योग विकास महामंडळाची योजना

cobbler community will get loan for business | चर्मकार समाजाला व्यवसायासाठी मिळणार कर्ज

cobbler community will get loan for business

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली :
संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत व्यवसायासाठी चर्मकार समाजातील चांभार, ढोर, मोची व होलार या चार जातींतील १८ ते ५० वर्षे वयोगटातील नागरिकांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. सदर योजनेचा लाभ देण्यासाठी कर्ज प्रस्ताव आमंत्रित करण्यात आले आहेत. कर्ज योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र जिभकाटे यांनी केले आहे.


शिक्षणासाठीही कर्ज
शैक्षणिक योजना (देशात शिक्षणासाठी १० लाख रुपये व परदेशात शिक्षणासाठी २० लाख रुपये) या योजनेचे उद्दिष्ट प्राप्त झालेले असून, यामध्ये १० हजार रुपये अनुदान आता ५० हजार रुपयांपर्यंत योजनानिहाय देण्यात येत आहेत.


अशा आहेत महामंडळाच्या कर्ज योजना
सन २०२४-२५ या चालू वर्षात बँकेमार्फत ५० टक्के अनुदान योजना, ५० हजार रुपयांपर्यंत बीज भांडवल योजना, ५० हजार, १ ते ५ लाखांपर्यंत त्याचप्रमाणे महामंडळ पुरस्कृत महिला अधिकारिता योजना ५ लाख रुपये, मुदत कर्ज योजना, २ लाख ते ५ लाख रुपयांपर्यंत, लघू ऋण योजना १.४० लाख रुपयांपर्यंत, महिला समृद्धी योजना १.४० हजार रुपये.


कोण घेऊ शकतो व्यवसायासाठी लाभ?
चांभार, ढोर, मोची व होलार या समाजातील नागरिक कर्ज योजनेचा लाभ घेऊ शकतात. यासाठी त्यांचे वार्षिक उत्पन्न ३ लाखांच्या आत असावे. लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तसेच अर्जदाराने महामंडळाच्या नियमाप्रमाणे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे.
 

Web Title: cobbler community will get loan for business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.