कुष्ठरोग निर्मुलनाकरीता सहकार्य करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 05:11 AM2021-02-28T05:11:44+5:302021-02-28T05:11:44+5:30

त्यांनी म्हटले आहे की कुष्ठरोग हा जीवाणुमुळे होणारा सांसर्गीक आजार आहे. अंगावर असणारा फिक्कट, लालसर रंगाचा बधीर चट्टा व ...

Collaborate for the eradication of leprosy | कुष्ठरोग निर्मुलनाकरीता सहकार्य करा

कुष्ठरोग निर्मुलनाकरीता सहकार्य करा

Next

त्यांनी म्हटले आहे की कुष्ठरोग हा जीवाणुमुळे होणारा सांसर्गीक आजार आहे. अंगावर असणारा फिक्कट, लालसर रंगाचा बधीर चट्टा व हाता पायामध्ये अशक्तपणा येणे हे कुष्ठरोगाचे प्रमुख लक्षणे आहेत. कानाच्या पाळ्या जाड होणे, चेहरा लालसर,तेलकट व जाड होणे, त्वचेची संलग्न मज्जा जाड व दुख-या होणे हे देखील कुष्ठरोगाचे लक्षणं होऊ शकतात.

यावर बहुविध औषधोपचार घेतल्यास कुष्ठरोग संपुर्ण बरा होतो. बहुविध औषधोपचाराने कुष्ठरोगातील विकृती टाळणे शक्य आहे. बहुविध औषधोपचार सर्व आरोग्य संस्थेत मोफत उपलब्ध आहे. अपुर्ण व अर्धवट उपचार हात पाय लुळे पडणे, हाता, पायाची बोटे वाकडी होऊन विकृती येऊ शकते. या आजारातील रुग्ण घरी राहुनही उपचार घेऊ शकतो. कुष्ठरोग हा सर्व वयोगटातील व्यक्तींना होऊ शकतो. असे असले तरी हा आजार बहुविध औषधोपचाराने पूर्णपणे बरा होत असल्याने लक्षणे दिसताच घाबरून न जाता नजीकच्या दवाखान्यात तपासणी करून कुष्ठरोग मुक्त समाज घडविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंमरे यांनी केले आहे.

Web Title: Collaborate for the eradication of leprosy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.