काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी सहकार्य करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:38 AM2021-05-21T04:38:55+5:302021-05-21T04:38:55+5:30
रांगी येथे ४५ वर्षांवरील एकूण ५१५ व्यक्ती आहेत. त्यापैकी १९८ व्यक्तींनी लस घेतली आहे. त्यामुळे उर्वरित व्यक्तींनी मनात कुठलीही ...
रांगी येथे ४५ वर्षांवरील एकूण ५१५ व्यक्ती आहेत. त्यापैकी १९८ व्यक्तींनी लस घेतली आहे. त्यामुळे उर्वरित व्यक्तींनी मनात कुठलीही शंका न बाळगता लसीकरण करून काेराेनाची सााखळी ताेडण्यासाठी सहकार्य करावे. शहरात लसीकरणासाठी रांगा लागतात, मात्र खेडेगावात गावात लस उपलब्ध असूनही लस घेतली जात नाही. त्यामुळे गावातील नारिकांमध्ये जागृती करावी, असे आवाहन तहसीलदारांनी केले. सभेला तहसीलदार सी. जी. पित्तुलवार, नायब तहसीलदार नानाजी भगत, संवर्ग विकास अधिकारी बंडू निमसरकार, सरपंच फालेश्वरी गेडाम, उपसरपंच नूरज हलामी, मंडळ अधिकारी, पोलीसपाटील कांटेगे, ग्रा. पं. सदस्य शशिकांत साळवे, दिनेश चापडे, शाळेचे मुख्याध्यापक, देवराव कुनघाडकर, दिवाकर भोयर, आशासेविका, अंगणवाडि सेविका उपस्थित होते. सभेचे संचालन व आभार सचिव बुराडे यांनी केले.
===Photopath===
170521\172748332651img-20210517-wa0044.jpg
===Caption===
पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना तहसीलदार सी. ज. पित्तुलवार.