उन्हाळी धान खरेदीकरिता पिकाचे सातबारे जमा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:36 AM2021-04-10T04:36:19+5:302021-04-10T04:36:19+5:30
जिल्हा मार्केटिंग अधिकारी गडचिरोली यांच्या सूचनेनुसार, रब्बी पणन हंगाम २०२० - २१ चा कालावधी हा ...
जिल्हा मार्केटिंग अधिकारी गडचिरोली यांच्या सूचनेनुसार, रब्बी पणन हंगाम २०२० - २१ चा कालावधी हा १ मे २०२१ ते ३० जून २०२१ पर्यंत राहणार असून, या हंगामातील उन्हाळी धान खरेदी करण्याकरिता सात-बारा मूळ प्रत (उन्हाळी धान उल्लेख असलेला ) नमुना आठ, बँकेची पासबुक झेराक्स प्रत, आधार कार्ड झेराक्स प्रत शेतकऱ्यांनी ३० एप्रिल २०२१ पर्यंत आरमोरी सहकारी शेतकी खरेदी-विक्री संस्थेच्या कार्यालयात जमा करावे.
३० एप्रिल २०२१ नंतर आलेल्या सात-बाऱ्यावर पोर्टल स्वीकारणार नाही. त्यामुळे याची नोंद शेतकरी बांधवांनी घेऊन आपले सातबारे संस्थेच्या कार्यालयात ३० एप्रिल २०२१ अगोदर जमा करावे, असे आवाहन आरमोरी सहकारी शेतकी खरेदी-विक्री संस्थेचे व्यवस्थापक अक्षय माकडे यांनी केले आहे.