अभियंत्यांचे सामूहिक रजा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 11:26 PM2018-03-19T23:26:22+5:302018-03-19T23:26:22+5:30

जि.प. अभियंता संवर्गाच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावाव्या, या मागणीसाठी जिल्हा परिषद अभियंता संघटनेच्या वतीने दोन दिवशीय सामूहिक रजा आंदोलन सोमवारपासून जिल्हा परिषदेसमोर सुरू करण्यात आले.

Collective Leave Movement of Engineers | अभियंत्यांचे सामूहिक रजा आंदोलन

अभियंत्यांचे सामूहिक रजा आंदोलन

Next
ठळक मुद्दे१०५ अभियंते सहभागी : विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदसमोर मांडला ठिय्या

आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : जि.प. अभियंता संवर्गाच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावाव्या, या मागणीसाठी जिल्हा परिषद अभियंता संघटनेच्या वतीने दोन दिवशीय सामूहिक रजा आंदोलन सोमवारपासून जिल्हा परिषदेसमोर सुरू करण्यात आले.
जिल्हा परिषद अभियंता संघटना महाराष्ट्र या नोंदणीकृत संघटनेस शासन मान्यता देणे, जिल्हा परिषदेतील अभियंत्यांना प्रवासभत्त्यापोटी दरमहा किमान १० हजार रूपये मासिक वेतनासोबत अदा करणे, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार नवीन उपविभाग निर्माण करणे, जिल्हा परिषदेतील अभियंता संवर्गास शाखा अभियंता पदाचा दर्जा देण्याचा दिनांक व त्याबाबत करावयाची वेतन निश्चिती, जलसंपदा विभागाकडील ६ डिसेंबर २०१४ रोजीच्या निर्णयाप्रमाणे करण्याबाबत ग्रामविकास विभागाचे आदेश निर्गमित करणे, जिल्हा परिषदेतील कनिष्ठ अभियंता संवर्गातील व स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातील सर्व रिक्तपदे विशेष बाब म्हणून भरणे, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग व ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील उपअभियंता पदावर जिल्हा परिषदेतील अभियंत्यांना द्यावयाच्या पदोन्नतीचा कोटा मंजूर पदांच्या प्रमाणात पुनर्विलोकीत करणे, जिल्हा परिषदेतील अभियंता संवर्गास अतांत्रिक कामे न देण्याबाबत आदेश निर्गमित करणे, जिल्हा परिषदेतील अभियंता संवर्गासाठी जीवनदायी आरोग्य विमा योजना (कॅशलेस मेडिक्लेम) लागू करणे, कनिष्ठ अभियंत्यांना व्यावसायिक परीक्षेबद्दल लागू केलेले २१ एप्रिल २००६ चे परिपत्रक रद्द करणे आदी मागण्यांसाठी अभियंता संवर्ग संघटनेच्या वतीने जि.प. समोर आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात जिल्हाभरातील १०५ अभियंता सामूहिक रजा घेऊन सहभागी झाले आहेत. त्यामुळे जिल्हाभरातील बांधकामाची कामे प्रभावित होण्याची शक्यता आहे. आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष भूजंग हिरे, डी.एम.वाडेकर, जुआरे यांच्यासह सदस्य सहभागी झाले आहेत.

Web Title: Collective Leave Movement of Engineers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.