जिल्हाधिकारी देचलीपेठा, किष्टापुरात पोहोचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 01:13 AM2018-03-28T01:13:14+5:302018-03-28T01:13:14+5:30

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी अहेरी तालुक्याच्या अतिदुर्गम देचलीपेठा, किष्टापूर भागात नुकताच दौरा करून कृषी विभागामार्फत झालेल्या विविध कामांची पाहणी केली.

Collector Dechalipetha reached Kishtwar | जिल्हाधिकारी देचलीपेठा, किष्टापुरात पोहोचले

जिल्हाधिकारी देचलीपेठा, किष्टापुरात पोहोचले

Next
ठळक मुद्देदौरा : कृषी विभागाच्या कामांची पाहणी

ऑनलाईन लोकमत
देचलीपेठा : जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी अहेरी तालुक्याच्या अतिदुर्गम देचलीपेठा, किष्टापूर भागात नुकताच दौरा करून कृषी विभागामार्फत झालेल्या विविध कामांची पाहणी केली.
गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या देचलीपेठा, किष्टापूर येथे जिल्हाधिकारी सिंह यांनी प्रथमच दौरा केला. या भागाच्या जंगल परिसरात कृषी विभागाकडून झालेल्या माती नाला बांधकाम, मजगी व इतर कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर देचलीपेठा येथील शासकीय आश्रमशाळेला भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. यावेळी अहेरीचे तहसीलदार प्रशांत घोरूडे, कृषी अधिकारी तांबे, कृषी सहायक शेंबलकर व इतर अधिकारी उपस्थित होते. या दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी सिंह यांनी देचलीपेठा व किष्टापूर भागातील विविध मूलभूत समस्या जाणून घेतल्या. जंगलातील वनोपजाची माहिती कर्मचाºयांकडून जाणून घेतली. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांशी संवादही साधला.

Web Title: Collector Dechalipetha reached Kishtwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.