जलसमाधी मिळालेल्या मुलींच्या कुटुंबीयांचे सांत्वन व आर्थिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:40 AM2021-05-20T04:40:01+5:302021-05-20T04:40:01+5:30
चामोर्शी : तालुक्यातील वाघोली नदी घाटावरून डोंग्याने नदी पार करताना झालेल्या अपघातात तीन शाळकरी मुली वैनगंगा नदीत बुडून त्यांचा ...
चामोर्शी : तालुक्यातील वाघोली नदी घाटावरून डोंग्याने नदी पार करताना झालेल्या अपघातात तीन शाळकरी मुली वैनगंगा नदीत बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर बुधवारी (दि. १९) आमदार डॉ. देवराव होळी यांनी शेंडे कुटुंबीयांची सांत्वनापर भेट घेतली. त्या कुटुंबीयांना वैयक्तिक आर्थिक मदत देऊन शासनाने प्रतिकुटुंब पाच लाख रुपयांची मदत देण्याची मागणी राज्य शासनाकडे केली.
या घटनेनंतर वाघोली गावावर शोककळा पसरली. आमदार होळी यांच्या भेटीप्रसंगी तलाठी सोमनकर, पोलीसपाटील व गावकरी उपस्थित होते. शासकीय मदतीसाठी मदत करण्याची सूचना त्यांना केली. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, भाजप युवा मोर्चाचे नेते प्रतीक राठी, याशिवाय नाजूक पोरटे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
===Photopath===
190521\img-20210519-wa0154.jpg
===Caption===
कुटुंबियांचे सांत्वन व आर्थिक मदत देताना आमदार डॉक्टर देवराव होळी