हाेड्री नाल्यावर पूल बांधकामाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:32 AM2021-02-15T04:32:20+5:302021-02-15T04:32:20+5:30

लाहेरी : भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम व मागास क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या होड्री नाल्यावर मागील वर्षी बेली ब्रिज मंजूर झाले ...

Commencement of construction of bridge over Hydri Nala | हाेड्री नाल्यावर पूल बांधकामाचा शुभारंभ

हाेड्री नाल्यावर पूल बांधकामाचा शुभारंभ

Next

लाहेरी : भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम व मागास क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या होड्री नाल्यावर मागील वर्षी बेली ब्रिज मंजूर झाले हाेते. परंतु कोरोना महामारीमुळे लाॅकडाऊन घाेषित झाल्यानंतर सर्व कामे ठप्प पडली. अनलाॅकनंतर सर्व सुरळीत झाल्यामुळे गुरुवारी होड्री नाल्यावर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही आदिवासी भागात दळणवळणाची सोय नसल्यामुळे उपचाराअभावी अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले हाेते. पुलाअभावी पावसाळ्यात नागरिकांना जीव मुठीत घेऊन नावेने प्रवास करावा लागताे. पावसाळ्यात जीवनावश्यक वस्तू पाेहाेचविणे आणि शासकीय कामासाठी लाहेरी किंवा तालुक्याच्या ठिकाणी भामरागडला जावे लागते. परंतु नाल्यावर पूल नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागते. मात्र आता पुलाचे बांधकाम हाेणार असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त हाेत आहे.

Web Title: Commencement of construction of bridge over Hydri Nala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.