अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी आयोग कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 12:47 AM2018-12-20T00:47:23+5:302018-12-20T00:48:09+5:30

राज्यातील अल्पसंख्यांक समुदायाचे सर्व मुलभूत प्रश्न सोडविण्यासाठी राज्य अल्पसंख्यांक आयोग कटिबध्द असून संपुर्ण योजना उपलब्ध करुन देण्यासाठी आयोग पुढाकार घेईल. अल्पसंख्याक समुदायांनी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अल्पसंख्यांक आयोग अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी केले.

Commision made for minorities development | अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी आयोग कटिबद्ध

अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी आयोग कटिबद्ध

Next
ठळक मुद्देहाजी अराफत शेख यांचे प्रतिपादन : शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्यातील अल्पसंख्यांक समुदायाचे सर्व मुलभूत प्रश्न सोडविण्यासाठी राज्य अल्पसंख्यांक आयोग कटिबध्द असून संपुर्ण योजना उपलब्ध करुन देण्यासाठी आयोग पुढाकार घेईल. अल्पसंख्याक समुदायांनी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अल्पसंख्यांक आयोग अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी राज्य शासन व केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबजावणी बाबतचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. विजय राठोड, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, जुनेद खान, राजा अदाटे, दिपक कैतके उपस्थित होते.
पुढे बोलताना शेख म्हणाले की, अल्पसंख्यांक समाजासाठी शासन विविध योजना राबवून त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करीत आहे. प्रत्यक्ष लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळतो की नाही, त्यात काही अडचणी आहेत काय, या बाबत जाणुन घेण्यासाठी आतापर्यंत १९ जिल्ह्यांना भेट देत असून त्यांचा साप्ताहिक अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहे. तसेच जिल्ह्यातील मुस्लीम समाजाच्या दफन भुमिच्या विकासासाठी निधी प्राप्त करुन देण्यात येईल. त्याकरीता शासनस्तरावर पाठपुरावा सुरु करण्यात आला आहे.
गडचिरोली येथे आल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील पारशी, जैन, बौध्द, मुस्लिम बांधवासमवेत बैठक घेऊन साधक बाधक चर्चा केली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्या समस्या निकाली काढण्याचे आश्वासन यावेळी शेख यांनी दिले.
अल्पसंख्याकांच्या योजना राबवित असलेल्या विविध विभागाच्या कार्यालय प्रमुखांकडून माहिती अवगत केली. सर्व योजना, लाभाचे प्रस्ताव प्रलंबित न ठेवता ते पूर्ण करुन शासनाकडे पाठवाव्यात व तसे आयोगाला कळवावे, जेणे करुन शासन स्तरावर पाठपुरावा करण्यास सुलभता येईल, असे सांगितले.
यावेळी सर्व विभागाचे अधिकारी, जिल्ह्यातील अल्पसंख्याक समुदायाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Commision made for minorities development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.