धानोरा तालुक्यात १०० टक्के लसीकरणाचा संकल्प करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:26 AM2021-06-03T04:26:28+5:302021-06-03T04:26:28+5:30

या सभेला प्रामुख्याने जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष ...

Commit to 100% vaccination in Dhanora taluka | धानोरा तालुक्यात १०० टक्के लसीकरणाचा संकल्प करा

धानोरा तालुक्यात १०० टक्के लसीकरणाचा संकल्प करा

Next

या सभेला प्रामुख्याने जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, ज्येष्ठ समाजसेवक देवाजी तोफा, सर्चच्या वतीने डॉ.आनंद बंग, तहसीलदार सी.जी. पित्तुलवार, संवर्ग विकास अधिकारी बंडू निमसरकार, डॉ. विनोद मशाखेत्री, मुख्याधिकारी डॉ. नरेंद्र बेंबरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वीरेंद्र भावे आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, लसीकरणाबाबत जे गैरसमज पसरले आहेत ते सर्व खोटे आहेत. कोणीही मरत नसून लस पूर्णपणे सुरक्षित आहे हे मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो. शास्त्रज्ञांनी वर्तवल्याप्रमाणे तिसरी लाट येणार आहे. त्यामध्ये लहान मुलांना अधिक धोका आहे. त्यामुळे कोरोनापासून सुरक्षेसाठी सर्व नागरिकांनी लसीकरण करावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी देवाजी तोफा, डॉ. आनंद बंग यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामसभा अध्यक्ष, सदस्य, महिला बचत गटाचे अध्यक्ष, सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.

(बाक्स)

२३० पैकी १७० गावे लसीकरणापासून दूर

धानोरा तालुक्यातील २३० गावांपैकी १७० गावातील नागरिकांनी लसीकरण केले नाही. ही अतिशय गंभीर बाब असून आरोग्य कर्मचारी, तालुका प्रशासन यांनी पदाधिकारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक यांना विश्वासात घेऊन नागरिकांना लसीकरणाकरिता प्रोत्साहित करावे, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

(बॉक्स)

कुटुंबरूपी संपत्तीचे रक्षण करा

यावेळी उपस्थित काही नागरिकांनी अधिकाऱ्यांपुढे लसीकरणबाबत आपल्या गावातील अनुभव कथन केले. नागरिकांचे मनोबल वाढवण्याकरिता पंचायत समिती सभापती अनसूया कोरेटी यांनी सभागृहात उपस्थितांसमोर लस घेतली. मनोहर पोरेटी यांनी कुटुंब ही आपली सर्वात मोठी संपत्ती असून कुटुंबातील व्यक्तीच्या आरोग्याचे रक्षण करणे गरजेचे आहे. त्यामुळे कोणतीही भीती न बाळगता सर्वांनी लसीकरण करावे, असे आवाहन केले.

Web Title: Commit to 100% vaccination in Dhanora taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.