वैद्यकीय महाविद्यालयासाठी समिती करणार अभ्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 06:00 AM2020-01-30T06:00:00+5:302020-01-30T06:00:34+5:30

मुख्यमंत्र्यांनी गडचिरोली येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करता येईल किंवा नाही याबाबतचा अहवाल शासनाला सादर करावे, असे निर्देश दिले आहेत. अहवाल सादर करण्यासाठी संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मुंबईने प्रा.डॉ.राजेंद्र सुरपाम यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांची भेट घेऊन त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

Committee to conduct study for medical college | वैद्यकीय महाविद्यालयासाठी समिती करणार अभ्यास

वैद्यकीय महाविद्यालयासाठी समिती करणार अभ्यास

googlenewsNext
ठळक मुद्देहालचालींना वेग : फेब्रुवारीमध्ये सादर करणार अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधा गडचिरोली येथे उपलब्ध आहेत काय, याची शहाानिशा करण्यासाठी समिती गठित करण्यात आली. सदर समिती प्रत्यक्ष गडचिरोली येथे येऊन अभ्यास करणार आहे व त्याबाबतचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला जाणार आहे.
गडचिरोली जिल्हा आदिवासीबहुल आहे. जिल्ह्यात कुपोषण, रक्तक्षय, मातामृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण अधिक आहे. तसेच खासगी रुग्णालयांची संख्या कमी आहे. खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची आर्थिक क्षमता येथील नागरिकांमध्ये नाही. त्यामुळे गडचिरोली येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून केली जात आहे. लोकप्रतिनिधींनी हा मुद्दा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आणून दिला. मुख्यमंत्र्यांनी गडचिरोली येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करता येईल किंवा नाही याबाबतचा अहवाल शासनाला सादर करावे, असे निर्देश दिले आहेत. अहवाल सादर करण्यासाठी संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मुंबईने प्रा.डॉ.राजेंद्र सुरपाम यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांची भेट घेऊन त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
प्रत्येक जिल्ह्यात एक याप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय असणे आवश्यक आहे. येथील मातामृत्यू, बालमृत्यू, कुपोषण, गरिबी आदी परिस्थिती लक्षात घेता वैद्यकीय महाविद्यालयाची गरज आहे. शासकीय महाविद्यालय होण्यासाठी जवळपास सर्वच सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालय मिळण्यासाठी केवळ आता राजकीय इच्छाशक्तींनी अधिक जोर लावण्याची गरज व्यक्त होत आहे.

आवश्यक असणाऱ्या बहुतांश सुविधा उपलब्ध
वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी किमान ५०० खाटांचे रुग्णालय ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. गडचिरोली येथील महिला व बाल रुग्णालयात २०० ते जिल्हा सामान्य रुग्णालयात २८६ खाटा आहेत. एकूण ४८६ खाटा उपलब्ध होतात. त्यामुळे खाटांचा प्रश्न उद्भवणार नाही. वैद्यकीय महाविद्यालयासाठी जवळपास २५ एकर जागा आवश्यक आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाला लागूनच वनविभागाची सेमानापर्यंत ५० एकरपेक्षा जास्त जागा उपलब्ध आहे. वनविभागाने ही जागा उपलब्ध केल्यास जागेचीही अडचण भासणार नाही. तसेच वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असलेले विविध विभाग सुद्धा गडचिरोली रुग्ण्णालयात उपलब्ध आहेत. त्यामुळे समितीचा अहवाल सकारात्मक राहण्याची शक्यता आहे.

Web Title: Committee to conduct study for medical college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.