अनधिकृत लॅबवर कारवाईसाठी तहसीलदारांच्या नेतृत्वात समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:26 AM2021-06-18T04:26:07+5:302021-06-18T04:26:07+5:30
प्रबंधक महाराष्ट्र पॅरावैद्यक परिषद मुंबई यांनी १० मे २०२१ ला अनधिकृत क्लिनिकल लॅबोरेटरी व पॅरावैद्यक व्यावसायिक यांच्याकडे महाराष्ट्र पॅरावैद्यक ...
प्रबंधक महाराष्ट्र पॅरावैद्यक परिषद मुंबई यांनी १० मे २०२१ ला अनधिकृत क्लिनिकल लॅबोरेटरी व पॅरावैद्यक व्यावसायिक यांच्याकडे महाराष्ट्र पॅरावैद्यक परिषद अधिनियम २०११ च्या रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र नसणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे. त्यानुसार गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांनी १७ मे २०२१ ला जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना कारवाई करण्याबाबत निर्देश दिले होते.
चामोर्शीचे तहसीलदार तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे तालुका अध्यक्ष जितेंद्र शिकतोडे यांनी कारवाईसाठी पुढाकार घेत समितीचे गठण केले. त्यात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बी. वाय. लायबर, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, पोलीस स्टेशन चामोर्शीचे निरीक्षक बी.पी. शेवाळे, आष्टी ठाण्याचे निरीक्षक कुमारसिंग राठोड, नगर पंचायतचे मुख्याधिकारी सतीश चौधरी यांचा प्रामुख्याने समावेश आहे.