माडिया भाषेत संवाद साधत जि.प. अध्यक्षांनी जाणल्या समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:33 AM2021-04-14T04:33:38+5:302021-04-14T04:33:38+5:30

अनेक वर्षांपासून मंगीगुडम नाल्यावर पक्क्या पुलाच्या प्रतीक्षेत असलेले आदिवासी ग्रामस्थ पूल होणार असल्याने भारावून गेले. त्यांनी जि.प. अध्यक्ष कंकडालवार ...

Communicating in Madiya language, Z.P. Problems identified by the President | माडिया भाषेत संवाद साधत जि.प. अध्यक्षांनी जाणल्या समस्या

माडिया भाषेत संवाद साधत जि.प. अध्यक्षांनी जाणल्या समस्या

Next

अनेक वर्षांपासून मंगीगुडम नाल्यावर पक्क्या पुलाच्या प्रतीक्षेत असलेले आदिवासी ग्रामस्थ पूल होणार असल्याने भारावून गेले. त्यांनी जि.प. अध्यक्ष कंकडालवार यांच्यासमाेर माडिया भाषेतच समस्यांचा पाढा वाचला. मुख्यतः रस्ते, पिण्याची पाण्याची सुविधा, आरोग्य व विजेची समस्या मांडली. त्यावर कंकडालवार यांनी माडिया भाषेतूनच उत्तर देत प्राधान्यक्रमाने समस्या सोडविण्याची ग्वाही दिली. पावसाळ्यात या गावाला भेट दिली त्यावेळी नाल्यावर पूल बांधकामाचे आश्वासन दिले होते. आता प्रत्यक्ष पुलाचे भूमिपूजन करून आश्वासनपूर्ती केल्याबद्दल जि.प. अध्यक्षांचे आदिवासी ग्रामस्थांनी माडिया भाषेतूनच आभार मानले.

यावेळी जि.प. सदस्य जयसुधा जनगाम, आविसचे तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम, झिंगानूरच्या सरपंच नीलिमा कारे, उपसरपंच शेखर गन्नारपू, आविसचे सल्लागार रवी सल्लम, माजी सरपंच कारे मडावी, बामणीचे सरपंच अजय आत्राम, सिरकोंडाचे सरपंच लक्ष्मण गावडे, मदारामचे माजी सरपंच इरफा मडावी, गरकापेठाचे उपसरपंच दासरी वेंकटी, दुर्गेश लंबाडी, सडवली जनगम, शंकर मडावी, समय्या कोंडागोरला, कोपेलाचे सरपंच सुरेश जनगम, कोरलाचे सरपंच गणपत वेलादी, लक्ष्मण कुळमेथे, धर्मय्या गावडे, बाबुराव कुमरी, रामा आत्राम, भीमराव कुळमेथे, पोरीय मडावी, सुरेश कुमरी, सिनू कुमरी, गणेश मडावी, शैलेश मडावी, फकिरा मडावी, साई मंदा, किरण वेमुला, प्रशांत गोडशेलवार, राकेश सडमेक, वेंकटस्वामी रामटेके, रोहन अल्लुरी, संतोष दुर्गम आदी उपस्थित होते.

Web Title: Communicating in Madiya language, Z.P. Problems identified by the President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.