गोसे खुर्दच्या पाण्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:34 AM2021-03-08T04:34:35+5:302021-03-08T04:34:35+5:30
गडचिरोली जिल्ह्यात पावसाचे पाणी नसताना जिल्ह्याच्या वरील भागात पाणी आल्याचे कारण देत गोसी खुर्द धरणाच्या माध्यमातून मोठ्या ...
गडचिरोली जिल्ह्यात पावसाचे पाणी नसताना जिल्ह्याच्या वरील भागात पाणी आल्याचे कारण देत गोसी खुर्द धरणाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यामध्ये महापुराची परिस्थिती निर्माण झाली. परिणामी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे पिके उद्ध्वस्त झाली. गाय, बैल अशी पाळीव जनावरे, शेतोपयोगी यंत्र, शेतकामाचे साहित्य पुरामुळे वाहून गेले. तसेच मोठ्या प्रमाणात घरांचीही पडझड झाली यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. मोठी मदत करण्याचे आश्वासन दिले; परंतु योग्य ती मदत केली नाही. त्यामुळे अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी आमदार होळी विधानसभेत केली.