बेराेजगार मुला-मुलींना स्पर्धा परीक्षेचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:45 AM2021-07-07T04:45:29+5:302021-07-07T04:45:29+5:30
काेरची : काेरची पाेलीस ठाण्याच्या वतीने बेराेजगार मुला, मुलींसाठी स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन वर्ग आयाेजित करण्यात आले असून या वर्गाची ...
काेरची : काेरची पाेलीस ठाण्याच्या वतीने बेराेजगार मुला, मुलींसाठी स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन वर्ग आयाेजित करण्यात आले असून या वर्गाची सुरुवात साेमवारपासून करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी ९५ युवक, युवतींनी हजेरी लावली.
कोरची तालुका हा अतिसंवेदनशील, मागास तालुका म्हणून गडचिरोली जिल्ह्यात ओळखला जाताे. मात्र येथे नेटवर्कचा अभाव वीज पुरवठा नेहमी खंडित हाेत असल्याने युवक व युवतींच्या अभ्यासात व्यत्यय येते. तसेच भरती प्रक्रियेबाबत त्यांना माहिती मिळत नाही. ही अडचण लक्षात घेऊन काेरची पाेलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी विनाेद गाेडबाेले यांनी युवक, युवतींसाठी वर्ग घेण्याचा निर्णय घेतला.
विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आणि स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत अधिक उत्साह दिसून येत आहे. या स्पर्धा परीक्षेबाबत पोलीस उपनिरीक्षक रवी मनोहर, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ हे युवक-युवतींना मार्गदर्शन करीत आहेत.