फसवणूक करणाऱ्या सरकारविराेधात तक्रार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:22 AM2021-07-24T04:22:14+5:302021-07-24T04:22:14+5:30

आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी जिल्हा संघटनेची बैठक ग्रामसेवक भवनात पार पडली. याप्रसंगी ते बाेलत हाेते. ...

Complain against a fraudulent government | फसवणूक करणाऱ्या सरकारविराेधात तक्रार करा

फसवणूक करणाऱ्या सरकारविराेधात तक्रार करा

googlenewsNext

आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी जिल्हा संघटनेची बैठक ग्रामसेवक भवनात पार पडली. याप्रसंगी ते बाेलत हाेते.

बैठकीला आरमोरीचे आमदार कृष्णा गजबे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष चांगदेव फाये, उपाध्यक्ष विनोद खुणे, फाल्गुन चौके,अशोक मडावी, एन .बी. पदा, केशव किरसान, व्यंकटी नागीलवर, हेमंत शेंद्रे, महेंद्र मेश्राम उपस्थित होते.

यावेळी आमदार कृष्णा गजबे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, चांगदेव फाये यांनीही मार्गदर्शन केले.

बाॅक्स

आविका संस्थांना पडताे भुर्दंड

आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था आर्थिक अडचणीत आल्या असून काही संस्था मोडकळीस आल्या आहेत. महामंडळाच्या वतीने खरेदी करण्यात आलेल्या धानाची रक्कम व बोनस शेतकऱ्यांना वेळेवर दिले जात नाही. त्यांची अडवणूक केली जाते. धानाची उचल एक ते दीड वर्ष केली जात नाही. त्यामुळे होणारे नुकसान सहकारी संस्थांना साेसावे लागते. संस्थांना भुर्दंड पडताे. धान खरेदी करताना साठवणुकीची व्यवस्था, गोदाम व्यवस्था, यासह अनेक कामे याच संस्थांना करावी लागतात. धान खरेदीचे कमिशन वेळेत न देणे, हमाली व्यवस्था, संस्थेच्या सदस्यांना लाभांश न मिळणे अशा अनेक समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी आपण पुढाकार घेऊ, असे आश्वासन आ. हाेळी यांनी याप्रसंगी दिले.

230721\23gad_3_23072021_30.jpg

मार्गदर्शन करताना आ. डाॅ. देवराव हाेळी, साेबत आ. कृष्णा गजबे, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष प्रंचित पाेरेड्डीवार, चांगदेव फाये.

Web Title: Complain against a fraudulent government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.