व्हॉट्स अॅपवरील आक्षेपार्ह मजकुराबाबत तक्रार
By admin | Published: July 14, 2017 02:13 AM2017-07-14T02:13:36+5:302017-07-14T02:13:36+5:30
येथील किशोर कार्तिक डे यांनी नगरसेवकांबाबत आक्षेपार्ह मजकूर व्हॉटस्अॅप गु्रपवर टाकल्याने एटापल्ली नगर
एटापल्लीतील प्रकार : नगरसेवकांबाबत विधान
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : येथील किशोर कार्तिक डे यांनी नगरसेवकांबाबत आक्षेपार्ह मजकूर व्हॉटस्अॅप गु्रपवर टाकल्याने एटापल्ली नगर पंचायतीच्या नगरसेवकांमध्ये असंतोष निर्माण झाला. त्या या प्रकरणाची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे.
नगर पंचायत ग्रुप तसेच आपली तालुका शाखा भाजप या व्हॉट्सअॅप ग्रुपवर किशोर डे याने नगरसेवकांना ‘लाचखोर’ असे संबोधले आहे. त्याचबरोबर अपमानीत करणारे इतरही शब्द टाकले आहेत. ही बाब एटापल्ली नगर पंचायतीच्या नगरसेवकांना माहित झाली. त्यानंतर त्यांनी या मजकुराबाबत नगरसेवकाने आक्षेप घेत याबाबतची तक्रार एटापल्ली पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवर एटापल्ली नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष सरीता राजकोंडावार, गटनेते दीपक सोनटक्के, उपाध्यक्ष रमेश गंपावार, नगरसेवक ज्ञानेश्वर रामटेके, सगुणा हिचामी, तानाजी दुर्वा, योगेश्वर नल्लावार, नामदेव दुर्गे, सुनिता चांदेकर, किरण लेकामी यांच्या सह्या आहेत. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित दोषीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, अहेरी येथे सुध्दा बुधवारी माजी ठाणेदार संजय मोरे यांच्या विरोधात अहेरी येथील काही नागरिकांनी तक्रार दाखल केली आहे.