तक्रारकर्त्यांचा एसीबीतर्फे सत्कार
By admin | Published: November 7, 2016 01:52 AM2016-11-07T01:52:57+5:302016-11-07T01:52:57+5:30
येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार नोंदवून यशस्वी सापळे रचून भ्रष्टाचारमुक्तीसाठी शासनाला सहकार्य करणाऱ्या
दक्षता जनजागृती सप्ताह : भ्रष्टाचार मुक्तीसाठी केली होती मदत
गडचिरोली : येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार नोंदवून यशस्वी सापळे रचून भ्रष्टाचारमुक्तीसाठी शासनाला सहकार्य करणाऱ्या तक्रारदात्यांचा एसीबीच्या कार्यालयात नुकताच सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने ३१ आॅक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत पार पडलेल्या दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्ताने तक्रारदात्यांचा सत्कार करण्यात आला.
दक्षता जनजागृती सप्ताहाच्या निमित्ताने गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, धानोरा, चामोर्शी, अहेरी, मुलचेरा आदी तालुक्यांमध्ये एसीबीच्या वतीने प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद साधून भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच ग्रामीण भागात गावागावांत पत्रकेही टाकण्यात आली. तसेच येथील एसीबी कार्यालयात तक्रारदात्यांचा सत्कार सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. यावेळी एसीबीचे पोलीस निरीक्षक एम. एस. टेकाम, सहायक फौजदार मोरेश्वर लाकडे, विठोबा साखरे, सत्यम लोहंबरे, रवींद्र कत्रोजवार, सतीश कत्तीवार, सुधाकर दंडिकेवार, मिलींद गेडाम, महेश कुकुडकार, गणेश वासेकर, सोनल आत्राम, घनश्याम वडेट्टीवार, संदीप कुरवटकर व कर्मचारी उपस्थित होते.