दुर्घटना विभागाचे काम पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:22 AM2018-04-26T00:22:24+5:302018-04-26T00:22:24+5:30
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी बुधवारी दुपारी अहेरी उपजिल्हा रुग्णालयास आकस्मिक भेट देऊन विविध कामांची तसेच संपूर्ण रुग्णालयाची पाहणी केली. मागील आठवड्यात जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी अहेरी उपजिल्हा रुग्णालयाचा आढावा घेऊन पाहणी केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी बुधवारी दुपारी अहेरी उपजिल्हा रुग्णालयास आकस्मिक भेट देऊन विविध कामांची तसेच संपूर्ण रुग्णालयाची पाहणी केली.
मागील आठवड्यात जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी अहेरी उपजिल्हा रुग्णालयाचा आढावा घेऊन पाहणी केली होती. त्यांच्या पाहणीनंतर बुधवारी जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी अहेरी उपजिल्हा रुग्णालयास भेट दिली. येथील महिला पुरुष वॉर्ड, शस्त्रक्रिया कक्ष, निमार्णाधिन असलेले दुर्घटना विभाग, रक्तपेढी, लहान मुलांचे कक्ष आदींची पाहणी केली. तसेच यापूर्वी घडलेल्या आगीच्या घटनेत अहेरी उपजिल्हा रुग्णालयातील विद्युत फिटींग जळाली होती. सदर इलेक्ट्रीक फिटींग अद्यापही पूर्ववत करता आली नाही. याची पाहणी सुध्दा जिल्हाधिकारी सिंह यांनी यावेळी केली. त्याअनुषंगाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. खंडाते यांना निर्देश दिले. तसेच सार्वजनिक विभागाचे अभियंता उसेंडी यांना दुर्घटना विभागाचे काम लवकर पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले. रिक्त पदांची माहिती घेऊन रिक्त पदे तत्काळ भरण्यासाठी कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सिंह यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. खंडाते यांना दिले.
याप्रसंगी अहेरीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी दामोदर नान्हे, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, तहसीदार प्रशांत भारुडे, डॉ. संजय उमाटे, डॉ. हकीम, डॉ. पटेल, डॉ. अक्षय जव्हेरी, डॉ. अमोल पेशट्टीवार आदी उपस्थित होते.