शौचालयांचे बांधकाम पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 11:39 PM2017-09-25T23:39:23+5:302017-09-25T23:39:48+5:30
तालुक्याच्या ग्राम पंचायत अंतर्गत २०१७-१८ या आर्थिक वर्षात समाविष्ट असलेल्या ग्राम पंचायत हद्दीतील शौचालय बांधकाम विहीत मुदतीत पूर्ण करावे,....
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : तालुक्याच्या ग्राम पंचायत अंतर्गत २०१७-१८ या आर्थिक वर्षात समाविष्ट असलेल्या ग्राम पंचायत हद्दीतील शौचालय बांधकाम विहीत मुदतीत पूर्ण करावे, योजना व अभियानाची माहिती गावागावांत पोहोचवावी, असे निर्देश अधिकाºयांनी कुरखेडा येथे सोमवारी आयोजित तालुकास्तरीय स्वच्छता मेळाव्यात दिले.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता हीच सेवा अभियान तालुकास्तरीय स्वच्छता मेळावा कुरखेडा येथे घेण्यात आला. या मेळाव्याचे उद्घाटन जि. प. सदस्य प्रभाकर तुलावी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी पं. स. सभापती गिरीधारी तितराम होते. कार्यक्रमाला पं. स. उपसभापती मनोज दुनेदार, जि. प. सदस्य प्रल्हाद कºहाडे, नाजूक पुराम, भाग्यवान टेकाम उपस्थित होते.
स्वच्छता हीच सेवा अभियान १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर २०१७ या कालावधीत राबविले जात आहे. या अभियानांतर्गत २०१७-१८ या आर्थिक वर्षातील समाविष्ट ग्राम पंचायतमधील शौचालय बांधकाम विहीत मुदतीत पूर्ण व्हावे. योजना व अभियानाची माहिती गावागावांत पोहोचावी याकरिता तालुकास्तरीय स्वच्छता मेळावा आयोजित करण्यात आला. यात प्रामुख्याने पं. स. सभापती, पं. स. सदस्य, जि. प. सदस्य, वार्षिक कृती आराखडा २०१७-१८ मध्ये समाविष्ट ग्राम पंचायतीचे सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, परिचारिका, एमपीडब्ल्यू, महिला बचत गट सदस्य, अंगणवाडी पर्यवेक्षिका, राष्टÑीय किशोरस्वास्थ्य केंद्र कर्मचारी, सर्व तालुका आशा, गटप्रवर्तक, तालुका आशा समन्वयक, विस्तार अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, केंद्रप्रमुख, ग्रामलेखा समन्वयक, ग्रामीण पाणीपुरवठा अभियंता, प्रधानमंत्री आवास, ग्रामीण गृह अभियंता, बीआरसी व सीआरसी कर्मचारी उपस्थित होते.
हागणदारीमुक्त आठ ग्रा.पं.चा सन्मान
स्वच्छ भारत अभियानांतर्गत २०१७-१८ या वर्षात हागणदारीमुक्त झालेल्या तालुक्यातील आठ ग्राम पंचायतींचा स्वच्छता मेळाव्यात सन्मान करण्यात आला. यामध्ये वडेगाव, उराडी, शिरपूर, जांभुळखेडा, गुरनोली, चांदागड, बेलगाव खैरी, अरततोंडी आदी गावांचा समावेश आहे. या ग्राम पंचातीच्या सरपंच व सचिव यांना शाल, श्रीफळ, शील्ड व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच त्यांच्या विशेष कामगिरीचे उपस्थित मान्यवरांनी कौतुकही केले.