चामाेर्शी शहरातील राष्ट्रीय महामार्गाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:26 AM2021-06-18T04:26:13+5:302021-06-18T04:26:13+5:30

चामोर्शी शहरातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ चे काम मागील एक वर्षापासून सुरू आहे. परंतु सदर काम अत्यंत संथगतीने सुरू ...

Complete the National Highway in the city of Chamarshi before the monsoon | चामाेर्शी शहरातील राष्ट्रीय महामार्गाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा

चामाेर्शी शहरातील राष्ट्रीय महामार्गाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा

Next

चामोर्शी शहरातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ चे काम मागील एक वर्षापासून सुरू आहे. परंतु सदर काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. कामाच्या संथगतीबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी नगरपंचायतीकडे प्राप्त झाल्या आहेत. सदर काम सुरू असताना रोडवर काँक्रिटीकरण न झाल्यामुळे जागोजागी पाणी साचले आहे. अपूर्ण कामामुळे पावसाळ्यात या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने काम सुरू असताना पावसाच्या पाण्याची योग्य विल्हेवाट लावून काम करण्यात यावे. तसेच सदर ठिकाणी कुठलीही जीवित अथवा वित्तहानी झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी महामार्ग प्राधिकरणची राहील, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. याबाबत जिल्हाधिकारी, सहायक अभियंता श्रेणी- १ राष्ट्रीय महामार्ग उपविभाग गडचिरोली, प्रोजेक्ट मॅनेजर ए.जी. कंन्स्ट्रक्शन ॲण्ड आरएसबीआईपीएल औरंगाबाद यांनाही पत्र देऊन कळविण्यात आले आहे.

बाॅक्स

हत्तीगेट चाैकात क्राॅसिंगवर कलव्हर्टची गरज

हत्ती गेट चौकात जिल्हा परिषद शाळेसमोर काम सुरू होण्याआधी गावातील मुख्य दोन नाल्यातील पाणी सिमेंट पाईपद्वारे वाहून जात होते. त्यापैकी एका क्रॉसिंगवर बॉक्स कलव्हर्ट बांधण्यात आले व दुसऱ्या क्राॅसिंगवर कोणतेही बांधकाम न करता ६०० मिमी डाया पाईप टाकण्यात आले; परंतु सदर ठिकाणी यापूर्वी जुने ९०० मिमी डायाचे पाईप असल्यामुळे नवीन टाकलेल्या पाईपमधून पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होणार आहे. त्या अनुषंगाने सदर ठिकाणी बॉक्स कलव्हर्ट बनवून द्यावे. तेव्हाच गावातील पाणी वाहून जाण्यास मदत होईल, असेही कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग गडचिरोली यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

===Photopath===

170621\img_20210617_110010.jpg

===Caption===

हायवेच्या कामात पाणी वाहून जाण्यासाठी लहान आकाराची टाकण्यात आलेली सिमेंट पाहिली फोटो

Web Title: Complete the National Highway in the city of Chamarshi before the monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.