रेल्वे स्टेशनवरील कामे तत्काळ पूर्ण करा
By admin | Published: December 22, 2016 02:18 AM2016-12-22T02:18:25+5:302016-12-22T02:18:25+5:30
स्थानिक रेल्वे स्टेशनवर विविध विकास कामे केली जात आहेत. या कामांच्या प्रगतीचा आढावा
अमितकुमार अग्रवाल यांचे निर्देश : कामाच्या प्रगतीचा घेतला आढावा
देसाईगंज : स्थानिक रेल्वे स्टेशनवर विविध विकास कामे केली जात आहेत. या कामांच्या प्रगतीचा आढावा दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे डीआरएम अमितकुमार अग्रवाल यांनी रेल्वे स्टेशनला मंगळवारी दुपारी १.३० वाजता प्रत्यक्ष भेट देऊन जाणून घेतला. विकास कामे तत्काळ पूर्ण करा, असे निर्देश रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिले.
देसाईगंज रेल्वे स्थानकावरील फलाटाची उंची वाढविणे, विस्तारिकरण करणे, पॅसेंजर ट्रॅक, गुड्स ट्रॅक, गुड्स गोडाऊन, पादचारी उडाणपूल, भूमीगत पुलाचा अॅपरोच रस्ता बांधकाम, भूमीगत पूल बांधकाम सुरू आहे. अग्रवाल यांनी वडसा रेल्वे स्टेशनला भेट देऊन विकास कामांचा आढावा घेतला. बैठकीदरम्यान विकास कामे तत्काळ मार्गी लावावी, असे निर्देश दिले. फलाटाचे विस्तारिकरण पूर्ण झाल्यावर दरभंगा एक्सप्रेस थांबेल, असा आशावाद व्यक्त केला. यावेळी वरिष्ठ एसडीओ ए. के. मसराम, डीओएम बर्मन, अर्जुन सिब्बल, वरिष्ठ डीईएन पी. व्ही. व्ही. व्ही. सत्यनारायण, रेल्वे सल्लागार समिती सदस्य डॉ. विष्णू वैरागडे, रवींद्र बेहरे, बाळासाहेब सगदेवे, नगरसेवक मोतिलाल कुकरेजा, पी. के. मिश्रा, एस. डी. बागडे, पांडे, गुप्ता, पाटील, अभियंता साहू, पी. एस. भोंडे, संजय कुमार आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)