संगणक टायपिंग १ जुलैपासून सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 05:00 AM2020-06-24T05:00:00+5:302020-06-24T05:00:48+5:30

१ जूनपासून संचार बंदीत शिथिलता दिली आहे. त्यामुळे आता १ जुलैपासून प्रशिक्षणास सुरुवात करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात ६० संस्थांमध्ये संगणक टायपिंग, मॅन्युअल टायपिंग आणि लघुलेखनचे धडे दिले जातात. लॉकडाऊनमुळे संस्थांवर आर्थिक परिणाम झाल्याचे संघटनेचे जिल्ह्याध्यक्ष विनोद राठी यांनी सांगितले. तीन महिन्यांपासून संस्था बंद असल्याने कर्मचाऱ्यांचा पगार, भाडे व इतर खर्च कसा भागवायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Computer typing starts from 1st July | संगणक टायपिंग १ जुलैपासून सुरू

संगणक टायपिंग १ जुलैपासून सुरू

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यात ६० संस्था : महाराष्ट्र परीक्षा परिषदेचा निर्णय, स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थ्यांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सुरु केलेल्या लॉकडाऊनमुळे संगणक टायपिंग, मॅन्युअल टायपिंग आणि लघुलेखन संस्था बंद होत्या. मात्र आता नुकतीच परीक्षा परिषदेने वाणिज्य शिक्षण संस्थांना निकष पाळून प्रवेश, तासिकांचे वेळापत्रक निश्चित करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील ६० टायपिंग संस्थांमध्ये १ जुलैपासून टायपिंगची टकटक ऐकू येणार आहे.
कोरोनाच्या प्रादूर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. या लॉकडाऊन कालावधीत सर्व शैक्षणिक संस्था बंद होत्या. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनेही जानेवारी ते जूनचे सत्र रद्द केले होते.
१ जूनपासून संचार बंदीत शिथिलता दिली आहे. त्यामुळे आता १ जुलैपासून प्रशिक्षणास सुरुवात करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात ६० संस्थांमध्ये संगणक टायपिंग, मॅन्युअल टायपिंग आणि लघुलेखनचे धडे दिले जातात. लॉकडाऊनमुळे संस्थांवर आर्थिक परिणाम झाल्याचे संघटनेचे जिल्ह्याध्यक्ष विनोद राठी यांनी सांगितले. तीन महिन्यांपासून संस्था बंद असल्याने कर्मचाऱ्यांचा पगार, भाडे व इतर खर्च कसा भागवायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सात चौरस फुटांचे अंतर अनिवार्य
१ जुलैपासून सुरू होणाºया प्रशिक्षणादरम्यान कोरोना नियमावलीचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या आदेशांचे वेळोवेळी पालन करावे. टंकलेखन यंत्रात किमान ७ चौरस फूट या प्रमाणात अंतर ठेवावे, त्या त्या क्षेत्रामध्ये लागू असलेल्या निर्बंधानुसार संस्था सुरू करावी, विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या वेळी सॅनिटायझरचा वापर करावा, प्रत्येक विद्यार्थ्यांचे व संबंधितांचे थर्मल स्कॅनिंग करावे, दोन बॅचेसमध्ये अर्धा तास अवकाश ठेवून प्रत्येकवेळी हॉल स्वच्छ व संगणक, टंकलेखक सॅनिटाईझ करावे, मास्क लावणे बंधनकारक करावे, साबणाने हात स्वच्छ धुण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना दिल्या आहेत.
परीक्षार्थ्यांना दिलासा
शासनाच्या अनेक विभागामध्ये टायपिंग अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांचा टायपिंग करण्याकडे कल आहे. त्यातच लॉकडाऊन असल्याने सर्व ग्रंथालये बंद आहेत. त्यामुळे हा वेळ उपयोगी लागावा, यासाठी अनेकांनी टायपिंग लावण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या पत्रानुसार १ जुलैपासून संस्था सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार शासनाच्या नियमांचे पालन करीत संस्था सुरु करणार आहोत.
- विनोद राठी, जिल्हाध्यक्ष,
चंद्रपूर जिल्हा टंकलेखन संस्था

१ जुलैपासून शासनमान्य संगणक टायपिंग कोर्स सुरु करण्याचे परीक्षा परिषदेच्या अध्यक्षाचे पत्र प्राप्त झाले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनांचे पालन करीत संस्था सुरु करणार आहोत.
- संजय लेडांगे, एमएससीईआयए
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

Web Title: Computer typing starts from 1st July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.