कृषिपंपधारकांसाठी वीजबिल भरण्यात सवलत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:31 AM2021-02-08T04:31:46+5:302021-02-08T04:31:46+5:30
चामाेर्शी : शासनाने नवीन कृषिपंप वीज धाेरण २०२० लागू केले असून, या अंतर्गत कृषी वीजदेयक थकबाकीदारांना वीजबिल भरण्यासाठी आकर्षक ...
चामाेर्शी : शासनाने नवीन कृषिपंप वीज धाेरण २०२० लागू केले असून, या अंतर्गत कृषी वीजदेयक थकबाकीदारांना वीजबिल भरण्यासाठी आकर्षक सवलत देण्यात आली आहे. या याेजनेंतर्गत नियमात बसणाऱ्या कृषिपंप वीजधारकांचे विलंब शुल्क व व्याज माफ हाेणार आहे, अशी माहिती वीज वितरण केंद्र चामाेर्शीचे प्रभारी सहायक अभियंता तथा येनापूर केंद्राचे कनिष्ठ अभियंता अभिषेक देशपांडे यांनी लाेकमतला दिली.
कृषिपंपधारक शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून शासनाच्या उद्याेग, ऊर्जा व कामगार विभागाने शेतकऱ्यांसाठी कृषिपंप वीज धाेरण २०२० आणले आहे. या धाेरणामुळे शेतकऱ्यांच्या विहिरीवर कृषिपंपाला तत्काळ वीजजाेडणी व कृषी वीजदेयक थकबाकीदारांना वीजबिल भरण्यासाठी आकर्षक सवलत मिळणार आहे. या याेजनेंतर्गत मार्च २०१८ पूर्वीच्या वीजजाेडणीला प्राधान्य देऊन नव्याने वीजजाेडणीसाठी येणाऱ्या अर्जावर वीजजाेडणी देण्यात येणार आहे. कृषिपंपाची थकबाकी वसूल करण्याच्या याेजनेला तीन वर्षाची मुदत देण्यात आली आहे.
बाॅक्स
..अशी मिळणार सवलत
पहिल्या वर्षात सुधारित देयक पूर्ण भरल्यास केवळ ५० टक्के रक्कम भरायची आहे आणि दुसऱ्या वर्षात ३० टक्के, तर तिसऱ्या वर्षी देयक भरले तर २० टक्के रक्कम माफ हाेणार आहे. जे शेतकरी २०१५ पूर्वीचे थकबाकीदार आहेत. अशा शेतकऱ्यांचे विलंब शुल्क व व्याज पूर्णत: माफ हाेणार असून, केवळ मुद्दल वसूल करण्यात येणार आहे. विलंब शुल्क माफ करत असताना व्याज दरातसुद्धा सूट देण्यात आली आहे, अशी माहिती महावितरणच्या वतीने देण्यात आली आहे.