ओबीसी उद्याेजकांकरिता सवलतीवर कर्जाची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:39 AM2021-09-18T04:39:49+5:302021-09-18T04:39:49+5:30
प्रवर्गातील युवक युवतींसाठी विविध योजना उपलब्ध आहेत. या योजनेचा युवक-युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहेत. ...
प्रवर्गातील युवक युवतींसाठी विविध योजना उपलब्ध आहेत. या योजनेचा युवक-युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहेत.
ओबीसी युवकांकरिता महामंडळामार्फत स्वयंरोजगाराकरिता, लघुउद्योग सुरू करण्यासाठी एक लाखाची बिनव्याजी थेट कर्ज योजना सुरु केली आहे.
२० टक्के बीजभांडवल योजनेंतर्गत कमाल मर्यादा पाच लाखांपर्यंत कर्ज दिले जाणार आहे. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत १० लाखपर्यंतच्या मर्यादेत कर्ज मंजूर केलेल्या अर्जदाराने वेळेत कर्जाचे हप्ते वेळेत भरल्यानंतर व्याजाची रक्कम १२ टक्के मर्यादित अर्जदाराच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. गट कर्ज व्याज परतावा योजना १० ते ५० लाखांपर्यंत कर्ज दिले जाईल.
इच्छुक उमेदवारांनी योजनेसंदर्भात www.msobcfdc.org या संकेतस्थळाला भेट द्यावी तसेच कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ जिल्हा कार्यालयाशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, आयटीआयमागे गडचिरोली येथे संपर्क साधावा.