चामोर्शी शहरात चिखलयुक्त रस्त्यामुळे नागरिकांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:40 AM2021-09-27T04:40:05+5:302021-09-27T04:40:05+5:30
गेल्या अनेक महिन्यांपासून रस्ता खोदून ठेवला असून, मोठमोठे खड्डे पडले आहेत. चामोर्शी हे शहर तालुक्याचे ठिकाण असून, येथे ...
गेल्या अनेक महिन्यांपासून रस्ता खोदून ठेवला असून, मोठमोठे खड्डे पडले आहेत. चामोर्शी हे शहर तालुक्याचे ठिकाण असून, येथे आजूबाजूच्या गावातील विद्यार्थी मोठ्या संख्येने शिक्षणासाठी येतात. चामोर्शी येथील मुख्य ठिकाणी परिवहन महामंडळाचा प्रवासी निवारा थांबा असल्याने शाळा सुटल्यानंतर घरी जाण्याकरिता विद्यार्थ्यांची येथे मोठी गर्दी होते.
दोन्ही बाजूंनी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. रस्त्याच्या एका बाजूचे खोलीकरण करण्यात आले आहे परंतु याठिकाणी पाणी साचले असल्याने ये-जा करणाऱ्या प्रवाशांना व विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये, यासाठी हे काम लवकर पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी युवा संकल्प संस्थेने आमदार डॉ. देवराव होळी यांना निवेदन देऊन केली आहे.
यावेळी शाखाप्रमुख सुरज नैताम, उपप्रमुख प्रशांत चुदरी, सदस्य अजय भाडेंकर, सुरज चौके, विजय भाडेकर, प्रशिक नदेश्चवर, ध्रुप चिचघरे, डॉ. विशाल सहारे, अजय बुराडे, सुरज सोयाम, कार्तिक चौके, दिलीप शेट्ये, भूषण बारसागडे, ज्ञानेश्वर लटारे, शंतनू पिपरे, राहुल चिचघरे, सचिन कुनघाडकर, अनुराग बन्सोड, स्वप्नील चिचघरे आदी उपस्थित होते.
260921\img-20210925-wa0124.jpg
युवा संकल्प संस्थेचे निवेदन फोटो