घोट-रेगडी मार्गाची दुरवस्था वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:42 AM2021-09-15T04:42:16+5:302021-09-15T04:42:16+5:30

रेगडी मार्गाने रेगडी, विकासपल्ली, देवदा, एटापल्ली, कसनसूर, छत्तीसगडला जोडलेला मार्ग आहे, तसेच रेगडी येथील कन्नमवार जलाशय बघण्यासाठी पर्यटक ...

The condition of the Ghot-Regdi road increased | घोट-रेगडी मार्गाची दुरवस्था वाढली

घोट-रेगडी मार्गाची दुरवस्था वाढली

Next

रेगडी मार्गाने रेगडी, विकासपल्ली, देवदा, एटापल्ली, कसनसूर, छत्तीसगडला जोडलेला मार्ग आहे, तसेच रेगडी येथील कन्नमवार जलाशय बघण्यासाठी पर्यटक या भागात माेठ्या संख्येने येतात. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनधारकांची रेलचेल असते. या मार्गाने रात्री-अपरात्री चारचाकी, दुचाकी व जड वाहने, तसेच एसटी बसही अवागमन करीत असतात, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

घोट-रेगडी मार्गावरील घोट ते पोतेपल्ली टोलापर्यंतच्या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, मार्ग उखडलेला आहे. त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालविताना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने या मार्गावर असलेले खड्डे बुजविण्यात यावे व घोट ते पोतेपल्ली टोलापर्यंत नव्याने डांबरीकरण करावे, अशी मागणी घोट व रेगडी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

140921\img-20210724-wa0001.jpg

घोट- रेगडी मार्गावर असलेले खड्डे

Web Title: The condition of the Ghot-Regdi road increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.