रोमपल्ली मार्गाची दुरवस्था कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:23 AM2021-07-05T04:23:26+5:302021-07-05T04:23:26+5:30

झिंगानूर : सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर ते रोमपल्ली या २७ किमी मार्गाच्या डांबरीकरणासाठी निधी मंजूर झाला. परंतु, या मार्गाच्या डांबरीकरणासाठी ...

The condition of Rompalli road is bad forever | रोमपल्ली मार्गाची दुरवस्था कायमच

रोमपल्ली मार्गाची दुरवस्था कायमच

Next

झिंगानूर : सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर ते रोमपल्ली या २७ किमी मार्गाच्या डांबरीकरणासाठी निधी मंजूर झाला. परंतु, या मार्गाच्या डांबरीकरणासाठी दिरंगाई होत आहे. परिणामी या मार्गाने ये-जा करताना नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

तालुक्यातील झिंगानूर ते सिरकोंडापर्यंतचे अंतर १७ कि.मी आहे. या रस्त्याचेसुद्धा डांबरीकरण करण्यात आले नाही. झिंगानूर ते रोमपल्ली हे अंतर २५ कि.मी. आहे. या भागात आदिवासी बांधव बहुसंख्येने आहेत. परंतु, या गावांमध्ये जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. सातत्याने मागणी करूनही शासन व प्रशासनाने या बाबीकडे लक्ष दिले नाही. गेल्या अनेक दिवसांपासून झिंगानूर परिसरातील नागरिक रस्ते व पुलाच्या समस्येपासून त्रस्त झाले आहेत. विद्यमान सरकारने याकडे लक्ष देऊन झिंगानूर परिसरातील दळणवळण व आवागमन समस्या मार्गी लावावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. दुरुस्तीकडे दुर्लक्ष हाेत आहे.

Web Title: The condition of Rompalli road is bad forever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.