धम्म, शील व संघाचे आचरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 10:29 PM2018-11-10T22:29:48+5:302018-11-10T22:31:00+5:30

गौतम बुद्धांनी जगाला शांतीचा संदेश दिला. आज जगातील परिस्थिती लक्षात घेतली तर शांतीचा मार्ग सुधारण्याची वेळ आली आहे. बौद्ध बांधवांनी धम्म, शील व संघाचे आचरण करावे, असे प्रतिपादन भंते भगिरथ यांनी केले.

Conduct Dhamma, Shil and Sangha | धम्म, शील व संघाचे आचरण करा

धम्म, शील व संघाचे आचरण करा

Next
ठळक मुद्देभंते भगिरथ यांचे प्रतिपादन : कोटरीतील वर्षावासाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्क
घोट : गौतम बुद्धांनी जगाला शांतीचा संदेश दिला. आज जगातील परिस्थिती लक्षात घेतली तर शांतीचा मार्ग सुधारण्याची वेळ आली आहे. बौद्ध बांधवांनी धम्म, शील व संघाचे आचरण करावे, असे प्रतिपादन भंते भगिरथ यांनी केले.
घोट परिसरातील कोटरी-माडेमुधोलीतील नालासंगमावरील अरण्यवास बौद्धविहारात वर्षावास समारोप सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आ.डॉ.देवराव होळी, जिल्हा परिषद सदस्य नामदेव सोनटक्के, भदंत प्रज्ञाशील महाथेरो, भिक्खू प्रज्ञानंद, भिक्खू धम्मरक्षित, भदंत धम्मचक्र, भंते अनोमदशी, भिक्षू रत्नमनी, श्रमीनर शांतीज्योती, भिक्षूनी सुजाता, सुमेधा आदी मान्यवर उपस्थित होते.
बौद्ध विहारातील बालोद्यान निर्माण केले जाणार आहे. या कामाचे लोकार्पण आ.डॉ.देवराव होळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, घोटचे सरपंच विनय बारसागडे, पशुराम दुधबावरे, वनपरिक्षेत्राधिकारी शेखर तनपुरे, अनूप अद्धेकीवार, प्रशांत शहा, रमेश अधिकारी, क्षेत्रसहायक दिलीप कौशिक, हेमंत उपाध्ये, इंडिया नगराळे आदी उपस्थित होते.
बौद्ध विहाराचा परिसर निसर्गमय आहे. या परिसराला ‘क’ दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. आ.डॉ.देवराव होळी यांच्या पुढाकारातून ५० लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Web Title: Conduct Dhamma, Shil and Sangha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.