काँग्रेसचे शिष्टमंडळ नगराध्यक्षांना भेटले

By Admin | Published: February 13, 2016 12:51 AM2016-02-13T00:51:24+5:302016-02-13T00:51:24+5:30

शहरात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला अपुरा पाणी पुरवठा, रस्ते, नाल्या, बंद पथदिवे यासह विविध समस्यांना ....

Congress delegation met the city chief | काँग्रेसचे शिष्टमंडळ नगराध्यक्षांना भेटले

काँग्रेसचे शिष्टमंडळ नगराध्यक्षांना भेटले

googlenewsNext

आंदोलनाचा दिला इशारा : शहरातील विविध समस्यांवर झाली चर्चा
गडचिरोली : शहरात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला अपुरा पाणी पुरवठा, रस्ते, नाल्या, बंद पथदिवे यासह विविध समस्यांना घेऊन जिल्हा काँग्रेस कमिटी व गडचिरोली शहर काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ गुरूवारी नगर पालिकेत जाऊन नगराध्यक्ष डॉ. अश्विनी धात्रक यांना भेटले. त्यांच्याशी शहरातील विविध समस्यांबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली. दरम्यान शहरातील समस्या तत्काळ मार्गी न लावल्यास काँग्रेसच्या वतीने नगर पालिका प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेस नेत्यांनी यावेळी दिला.
जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, प्रदेश सचिव हसनअली गिलानी, ज्येष्ठ नेते रवींद्र दरेकर यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नगराध्यक्ष डॉ. अश्विनी धात्रक यांची भेट घेतली. यावेळी त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मुख्याधिकारी यांनाही भेटून निवेदन देण्यासाठी काँग्रेसचे शिष्टमंडळ पालिका कार्यालयात गेले. मात्र मुख्याधिकारी गिरीष बन्नोरे हे कामानिमित्त बाहेर असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. नगराध्यक्षांना दिलेल्या निवेदनाची प्रत मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षात उपस्थित कर्मचाऱ्यांमार्फत पाठविण्यात आली.
यावेळी युवक काँग्रेसचे पदाधिकारी पंकज गुड्डेवार, गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, शहर अध्यक्ष सतीश विधाते, जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष भावना वानखेडे, रजनिकांत मोटघरे, एनएसयुआयचे अध्यक्ष नितेश राठोड, विधानसभा अध्यक्ष अमोल भडांगे, शंकरराव सालोटकर, प्रतिक बारसिंगे, तौफीक शेख, ओबीसी सेलचे अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, काशिनाथ भडके, नंदू वाईलकर, कुणाल पेंदोरकर, पालिकेचे पाणी पुरवठा सभापती नंदू कायरकर, नगरसेविका पुष्पा कुमरे, लता मुरकुटे, महिला काँग्रेसच्या पदाधिकारी प्रतिभा जुमनाके, जावेद शेख, बासिद शेख, गौरव आलाम, जीवन कुत्तरमारे, केवलराम नंदेश्वर, कमलेश खोब्रागडे, हेमंत मोहीतकर, राकेश गणवीर, अमर दातारकर, रोहित सादुलवार, अमर नवघडे, आदित्य मडावी, वृषभ धुर्वे, अक्षय साखरकर, तुषार कुळमेथे, प्रफुल आचले, प्रदीप नुरेशीया, बालू मडावी, पौर्णिमा भडके, जितू मुनघाटे, काशिनाथ गुरनुले आदी कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)

निवेदनातील मागण्या
शहरातील अपुऱ्या पाणी पुरवठ्याची समस्या तत्काळ निकाली काढण्यात यावी, इंदिरा गांधी चौकातील बंद असलेले वाहतूक दिवे तत्काळ सुरू करावे, इंदिरा नगर, रामनगर, विवेकानंदनगरातील नागरिकांना जमिनीचे पट्टे द्यावे, बोरमाळा नदी घाट मार्गाची पक्की दुरूस्ती करावी, शहरातील सर्व वार्डात नियमित नाली स्वच्छता करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात यावी, नगर पालिका क्षेत्रातील ज्या भागात रस्ते, नाल्यांचा अभाव आहे. त्या ठिकाणी रस्ते व नाली बांधण्यात यावे.

Web Title: Congress delegation met the city chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.