काँग्रेस सावकारी पाशातून मुक्त
By admin | Published: August 14, 2015 01:48 AM2015-08-14T01:48:42+5:302015-08-14T01:48:42+5:30
निवडणुकांपूर्वी गोरगरीब व शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन सत्तेवर येणाऱ्या विद्यमान सरकारचा खरा चेहरा आता समोर येत आहे. काँग्रेस पक्ष सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो.
कुरखेडा : निवडणुकांपूर्वी गोरगरीब व शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन सत्तेवर येणाऱ्या विद्यमान सरकारचा खरा चेहरा आता समोर येत आहे. काँग्रेस पक्ष सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. पूर्वी जिल्ह्यात काँग्रेस पक्षावर राजेशाही व सावकारांचे पाश होते. परंतु आता जिल्हा काँग्रेस राजेशाही थाट व सावकारी पाशातून मुक्त झाली आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांनी केले.
कुरखेडा येथील राजीव भवनात बुधवारी घेण्यात आलेल्या काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून उसेंडी बोलत होते. मेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस हसनअली गिलानी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जीवन नाट, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष राजू गारोदे, माजी जि. प. सदस्य पुंडलिक आकरे, देसाईगंज काँग्रेस तालुकाध्यक्ष विलास ढोरे, पं. स. सभापती शामिना उईके, जि. प. सदस्य सरिता वाटगुरे, पं. स. सदस्य प्रभाकर तुलावी, माजी जि. प. उपाध्यक्ष केशव राऊत, अयुब खान, राजू रासेकर, रामाजी किरंगे, पुंडलिक निपाने, गुलाबराव डांगे, एजाज शेख, रोहित ढवळे, माजी सरपंच आशा तुलावी, आशा कुमरे, नलिनी माने, नंदा रणदिवे, संध्या नैताम, जयश्री धाबेकर, ललीता वालदे, निर्मल हलामी, अमोल पवार, सुभाष नैताम, ताराचंद खोब्रागडे, ताहेर मुघल, आशिद शेख, उस्मान खान उपस्थित होते. संचालन अविनाश डोंगरे, प्रास्ताविक प्रभाकर तुलावी तर आभार जयंत हरडे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)