काँग्रेसची तहसील कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 10:21 PM2017-12-21T22:21:11+5:302017-12-21T22:21:25+5:30

एटापल्ली तालुक्यातील विविध समस्यांचे निराकरण करण्यात यावे, या मुख्य मागणीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तालुका शाखा एटापल्लीच्या वतीने गुरूवारी तहसील कार्यालयावर धडक दिली. तहसील कार्यालयासमोर धरणे देऊन मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर केले.

Congress hits tehsil office | काँग्रेसची तहसील कार्यालयावर धडक

काँग्रेसची तहसील कार्यालयावर धडक

Next
ठळक मुद्देएटापल्लीत धरणे आंदोलन : तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा, रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी निधी द्या

लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : एटापल्ली तालुक्यातील विविध समस्यांचे निराकरण करण्यात यावे, या मुख्य मागणीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तालुका शाखा एटापल्लीच्या वतीने गुरूवारी तहसील कार्यालयावर धडक दिली. तहसील कार्यालयासमोर धरणे देऊन मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर केले.
शेतमाल उत्पादनात ६० टक्के घट झाली असल्याने एटापल्ली तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करावा, शेतकºयांना एकरी १० हजार रूपये आर्थिक मदत द्यावी, जबरानजोत शेतकºयांचे प्रलंबित वनहक्काचे दावे निकाली काढावे, जारावंडी, कसनसूर ते एटापल्ली रस्त्याचे मजबुतीकरण करावे, कांदळी रस्त्यावरील पूल व जुरी नाल्यावरील पुलाच्या बांधकामाला निधी उपलबध करून द्यावा, एटापल्ली ते जारावंडी मार्गावरून बस सुरू करावी, पिपली बुर्गी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम तत्काळ सुरू करावे, जारावंडी येथे राष्टÑीयकृत बँकेची शाखा सुरू करावी, शेतीविषयक योजनांच्या लाभाकरिता अनुसूचित जमातीच्या शेतकºयांसाठी लागू केलेली जात वैधता प्रमाणपत्राची अट शिथील करावी, आदी मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य संजय चरडुके यांनी केले. यावेळी शालिकराम गेडाम, सरपंच सुधाकर टेकाम, शामल मडावी, सुनंदा ईके, रमेश गंप्पावार, हरिदास टेकाम, दिलीप दास, उषा ठाकरे, ज्ञानेश्वर रामटेके आदी उपस्थित होते.

Web Title: Congress hits tehsil office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.