काँग्रेस सदस्य नोंदणी मोहिमेला सुरूवात
By admin | Published: November 20, 2014 10:52 PM2014-11-20T22:52:42+5:302014-11-20T22:52:42+5:30
देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस पक्षाच्या जिल्हा सदस्य नोंदणी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या उपस्थितीत
गडचिरोली : देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस पक्षाच्या जिल्हा सदस्य नोंदणी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या उपस्थितीत सदस्य नोंदणी कार्यक्रम प्रारंभ झाला.
यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, प्रदेश सदस्य रविंद्र दरेकर, प्रदेश सचिव हसनअली गिलानी, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव, पंकज गुड्डेवार आदी उपस्थित होते. यावेळी रोहिदास पाटील यांनी काँग्रेस पक्षाची विचारधारा ही सर्वधर्म समभावाची असून नेहरू गांधी यांच्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळून देशाचा विकास झाला. काँग्रेसमुक्त भारत करण्याचे वक्तव्य म्हणजे, देशातील मानसाचे स्वातंत्र्य व विकास नाकारण्याची भाषा आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी डॉ. उसेंडी यांनी यंदा पाऊस उशीरा आल्याने जिल्ह्यातील धान उत्पाादकाचे मोठे नुकसान झाले आहे. भाजप सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी १० हजार रूपयाची आर्थिक मदत व साडेतीन ते ४ हजार रूपये भाव धानाला द्यावा, अशी मागणी करीत हिवाळी अधिवेशनात काँग्रेस पक्षातर्फे तीव्र आंदोलन उभारले जाईल, असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाला हसन गिलानी, रविंद्र दरेकर आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी सदस्य नोंदणी मोहिमेचाही प्रारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला गडचिरोलीचे तालुकाध्यक्ष शंकरराव सालोटकर, भामरागडचे तालुकाध्यक्ष मादी केसा आत्राम, प्रभाकर वासेकर, काशिनाथ भडके, मुक्तेश्वर गावडे, मेहबूब अली, पांडुरंग घोटेकर, डी. डी. सोनटक्के, सतिश विधाते, सुखमाबाई जांगधुर्वे, प्रतिभा जुमनाके, माया मोहुर्ले, कल्पना वड्डे, दर्शना लोणारे, आशा बांबोळे, लता पेदापल्ली, दर्शना मेश्राम, अमिता मडावी, रेखा मडावी, विनोद खोबे, वैभव भिवापुरे, नरेंद्र भैसारे, पी. टी. मसराम, तुळशीदास भोयर, किशोर चाफले, अशोक चलाख, मिलिंद किरंगे, रवी उसेंडी, प्रमोद देविकर, महेंद्र ब्राम्हणवाडे, मिलिंद बागेसर, रविंद्र पाल, सुशिल शहा, थुटाराम बांबोळे, लक्ष्मण कोवे, बंडू आत्राम, चैतू आत्राम आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)