विकासासाठी काँग्रेसची सत्ता आवश्यक

By admin | Published: July 22, 2016 01:30 AM2016-07-22T01:30:39+5:302016-07-22T01:30:39+5:30

आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षातून निष्ठावान तसेच स्वच्छ प्रतिमेच्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेतून उमेदवारी देऊन

Congress needs power for development | विकासासाठी काँग्रेसची सत्ता आवश्यक

विकासासाठी काँग्रेसची सत्ता आवश्यक

Next

 नामदेव उसेंडी यांचे प्रतिपादन : लांझेडा प्रभागात आढावा बैठक
गडचिरोली : आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षातून निष्ठावान तसेच स्वच्छ प्रतिमेच्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेतून उमेदवारी देऊन नगर पालिकेवर सुशासन व विकासाकरिता काँग्रेसची सत्ता आवश्यक आहे. याकरिता संपूर्ण कार्यकर्त्यांनी एकजुटीने कार्य करावे, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. नामदेव उसेंडी यांनी सोमवारी केले.
शहर काँग्रेसच्या वतीने आगामी नगर पालिका निवडणुकीसंदर्भात आढावा बैठक लांझेडा प्रभागात घेण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. उसेंडी बोलत होते. नगर पालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे केवळ कंत्राट मिळविण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून होत आहे, अशी टीकाही उसेंडी यांनी केली. यावेळी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, ओबीसी सेलचे अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, जिल्हा महासचिव प्रभाकर वासेकर, काशिनाथ भडके, नरेंद्र भरडकर, सतीश विधाते, नंदू वाईलकर, रजनीकांत मोटघरे, पं. स. सदस्य अमिता मडावी, कुणाल पेंदोरकर, एजाज शेख, राजेंद्र कुकुडकर, शंकर नैताम, विजय भांडेकर, योगेश नैताम, वर्षा नैताम, नंदू सोमनकर, गजू इंदूलवार, सुभाष वैरागडे, अनिल चापडे व कार्यकर्ते हजर होते. संचालन एजाज शेख यांनी केले. (शहर प्रतिनिधी)
 

Web Title: Congress needs power for development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.