केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:39 AM2021-09-26T04:39:53+5:302021-09-26T04:39:53+5:30
महागाई वाढत असल्याने सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. तरीही निर्ढावलेल्या केंद्र सरकारला जाग आली नाही. केंद्र सरकार विरुद्ध ...
महागाई वाढत असल्याने सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. तरीही निर्ढावलेल्या केंद्र सरकारला जाग आली नाही. केंद्र सरकार विरुद्ध घोषणा करत दरवाढ मागे घेण्यात यावी म्हणून केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, जिल्हा समन्वयक हसनअली गिलानी, जि. प. उपाध्यक्ष मनोहर पोरटी, प्रदेश सचिव अतुल मल्लेवार, कोषाध्यक्ष प्रभाकर वासेकर, शहराध्यक्ष सतीश विधाते, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग घोटेकर, अनु. जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष डी. डी. सोनटक्के, जिल्हाध्यक्ष रोजगार व स्वयंरोजगार सेल काशिनाथ भडके, महासचिव समशेरखा पठाण, कार्यालयीन सचिव एजाज शेख, उपाध्यक्ष अनिल कोठारे, नेताजी गावतुरे, रामदास टिपले, लहुकुमार रामटेके, उपाध्यक्ष शंकर सालोटकर, मनोज वनमाळी, संजय चरडुके, नंदू वाईलकर, दिवाकर मिसार, धीवरू मेश्राम, आशिष कामडी, वसंत राऊत, गौरव येनप्रेडीवार, प्रभाकर तुलावी, रूपचंद उंदीरवाडे, निजाम पेंदाम, जमाल शेख, घनश्याम वाढई, अनु. जाती विभागाच्या अध्यक्षा अपर्णा खेवले, कल्पना नंदेश्वर, आशा मेश्राम, नीता वडेट्टीवार, सुनीता रायपुरे, मालती पुराम, बबिता उसेंडी, स्मिता संतोषवार, सुनील चडगुलवार, समया पसुला, हरबाजी मोरे, महादेव हिचामी, तेजस मडावी, किसन हिचामी, रमेश गप्पावर, अजय भांडेकर, किशोर भांडेकर, प्रकाश भुरले, राकेश रत्नावर, संघमित्रा राजवाडे, सुमन उंदीरवाडे आदी हजर हाेते.